दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना इमेलद्वारे मुलीच्या अपहरणाची धमकी देणाऱ्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. केजरीवाल यांना एक इमेल आला त्यामध्ये आम्ही तुमच्या मुलीचे अपहरण करू असा मजकूर होता. या इमेलमध्ये तिचे अपहरण करण्याची धमकी देण्यात आली होती. ९ जानेवारी रोजी हा इमेल आला होता.
या प्रकरणाची तातडीने दखल घेत पोलिसांच्या सायबर सेलने हा इमेल पाठवणाऱ्याला ताब्यात घेतले. झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार या मुलाचे नाव दीपक आहे. आम्ही तुमच्या मुलीचे अपहरण तुम्ही काही करु शकता का? असे इमेलमध्ये विचारण्यात आले होते. त्यानंतर कसोशीचे प्रयत्न करत हा इमेल पाठवणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. हा इमेल पाठवणाऱ्याचे नाव विकास आहे असेही समजते आहे. त्याने हा इमेल का पाठवला? त्याला काय करायचे होते? अरविंद केजरीवाल यांचा इमेल आयडी त्याला कसा मिळाला या सगळ्या प्रश्नांसंदर्भात दिल्ली पोलीस या तरुणाची चौकशी करत आहेत.
याआधीही अरविंद केजरीवाल यांना काही इमेल आले होते. या इमेलशी या तरुणाचा काही संबंध आहे का? याचीही चौकशी केली जाते आहे. असेही पोलिसांनी सांगितले आहे.