दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून ४ महिने मुक्काम ठोकून एका व्यक्तीने हॉटेल मालकाला तब्बल २३ लाखांचा चुना लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या व्यक्तीने मी संयुक्त अरब अमिरातीचा नागरिक असल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे यूएईच्या राजघराण्याचा कर्मचारी असल्याचेही त्याने सांगितले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तक्रार दाखल केली असून त्याच्यावर चोरी तसेच फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा >> लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी मायावतींचा ‘एकला चलो रे’चा नारा! भाजपाला रोखणं कठीण होणार?
नेमकं काय घडलं?
गेल्या वर्षी दिल्लीमधील लीला पॅलेस नावाच्या हॉटेलमध्ये एमडी शरीफ नावाची व्यक्ती राहण्यास आली होती. या व्यक्तीने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना तो संयुक्त अरब अमिरातीमधील रहिवासी असल्याचे सांगितले. तसेच आपले नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी त्याने तशी कागदपत्रेही कर्मचाऱ्यांना दाखवली. त्यानंतर शरीफ या हॉटेलमध्ये १ ऑगस्ट ते २० नोव्हेंबर अशा साधारण चार महिन्यांसाठी या हॉटेलमध्ये राहिला. त्यानंतर अचानकपणे कोणालाही न सांगताच तो निघून गेला. या चार महिन्यांच्या त्याच्या मुक्कामाचे बील साधारण २३ लाख रुपये झाले होते.
हेही वाचा >> Video : राहुल गांधींच्या सुरक्षेत पुन्हा हलगर्जीपणा? पंजाबमध्ये तरुण थेट जवळ आला अन्…
राजघराण्यातील लोकांशी ओळख असल्याची बतावणी
आरोपी लीला पॅलेस हॉटेलमधील खोली क्रमांक ४२७ मध्ये राहात होता. त्याने जवळपास ११.५ लाख रुपये परत दिले होते. मात्र उर्वरित रक्कम न देता तो २० नोव्हेंबर रोजी दुपारी तेथून निघून गेला. आरोपीने हॉटेलमधील कर्मचाऱ्यानां तो संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहात असल्याचे सांगितले होते. तसेच अबू धाबीमधील राजघराण्यातील सदस्य शेख फलाह बिन झायेद अल नाहयान यांच्या कार्यालयात काम केलेले असल्याचेही त्याने सांगितले होते. शेख यांच्यासोबतही काम केल्याचा दावा त्याने केला होता.
हेही वाचा >> मोठी बातमी! लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की जागतिक दहशतावादी म्हणून घोषित
दरम्यान, पोलिसांनी आरोपीने हॉटेल कर्मचाऱ्यांना दाखवलेले कागदपत्रं खरे नाहीत. तसेच त्याचा राजघराण्याशीही संबंध नाही, अशी माहिती दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.