बिहारमधील काँग्रेस आमदार नितू सिंह यांच्या घरी २४ वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. नवादा जिल्ह्यात ही घटना समोर आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पियुष सिंह, असं मृत तरूणाचं नाव आहे. पियुष सिंह हा नितू सिंह यांचा नातेवाईक होता. गेल्या काही दिवसांपासून नितू सिंह या पाटण्यात होत्या. घटनेच्या वेळी घरी कुणीच नव्हतं.

पियुष सिंह शनिवारी ( २८ ऑक्टोबर ) सायंकाळी ७ वाजता गोलू सिंहकडे गेला होता. पण, घरी परतलाच नाही, असं तपासात समोर आलं आहे. शनिवारीच पियुष सिंहचा खून झाल्याचा संशय पोलिसांना आहे.

हेही वाचा : धक्कादायक! ३१ वर्षीय मॉडेलचा फ्रिजमध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, मृत्यूआधी केला भयावह प्रकार

नवाडा पोलीस अधीक्षक अंबरीश राहुल म्हणाले, नितू सिंह यांचा पुतण्या गोलू सिंहच्या खोलीत पियूष सिंहचा मृतदेह पोलीस पथकाला आढळला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीम तपासासाठी दाखल झाली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस नितू सिंहच्या घरात तपास करत आहेत.

हेही वाचा : धक्कादायक! सूरतमध्ये एकाच कुटुंबातल्या सात जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये समोर आलं ‘हे’ कारण

“प्राथमिक तपासाच्या आधारावर गोलू सिंहवर संशय व्यक्त केला जात आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. संशयित गोलू सिंह फरार आहे. शवविच्छेदनानंतर सर्व माहिती समोर येईल,” असं पोलीस अधिक्षकांनी सांगितलं.