Man Grabs Leopard By Tail: वन्यजीव प्राणी आणि मानवाचा संघर्ष आता वरचेवर वाढू लागला आहे. जंगलाचे कमी होत चाललेले क्षेत्र आणि जंगलावरील अतिक्रमण वाढल्यामुळे ग्रामीण भागात वन्यजीव मानवी वस्तीत आल्याचे प्रकार वरचेवर घडत आहेत. कर्नाटकच्या तुमकुरू जिल्ह्यातील चिक्ककोट्टीगेहळ्ळी गावात बिबट्या शेतात शिरला. या बिबट्याने गावकऱ्यांना नुकसान पोहोचवू नये, यासाठी एका शेतकऱ्याने धैर्य दाखवत बिबट्याची शेपटी पकडून त्याला काही वेळ रोखून धरले. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. हे गाव मेट्रो शहर म्हणून मानल्या जाणाऱ्या बंगळुरूहून १६० किमी अंतरावर आहे.

४३ वर्षीय योगानंद उर्फ आनंद उर्फ बॉम्बे या उपनावांनी ओळखल्या जाणाऱ्या गावकऱ्याने बिबट्याची शेपटी पकडून त्याला धरून ठेवले. रोजगारासाठी मुंबईत नोकरीला गेल्यानंतर योगानंदला बॉम्बे असे नाव पडले होते. त्याच्या या कृतीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर चर्चा रंगत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे सविस्तर वृत्त दिले आहे.

Image of the Supreme Court building
Ladki Bahin Yojana : “सरकारकडे ‘लाडकी बहीण’ सारख्या योजनांसाठी पैसे आहेत पण…”, मोफत पैसे देण्याच्या योजनांवर सर्वोच्च न्यायालयाचा संताप
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Girl's Hair Cut case At Dadar Station
“म्हणून मी तिचे केस कापले…”, दादर स्थानकात तरुणीचे केस कापणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा
Image Of Anita Anand
Anita Anand : कोण आहेत भारतीय वंशाच्या अनिता आनंद, ज्यांना मिळू शकते कॅनडाच्या पंतप्रधानपदाची संधी
torres ponzi scam in mumbai
Torres Ponzi Scam: ‘असा’ झाला टोरेस कंपनीचा घोटाळा; मालक विदेशात फरार, अनिश्चिततेत गुंतवणूकदार!
Assam Assam Coal Mine Rescue
Assam: दुर्दैवी घटना! आसाममध्ये २०० फूट खोल बेकायदा कोळसा खाणीतून एका कामगाराचा मृतदेह काढला; ९ जण अद्यापही अडकलेलेच
Bengaluru Crime News
मुलांना विष पाजलं, स्वत:ही केली आत्महत्या; बंगळुरूत दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य; मरणापूर्वी लिहिला सविस्तर ईमेल!
Image of Elon Musk, Chris Anderson, or a related graphic
Elon Musk : “तुमच्या पोस्ट्समुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो”, TED Talks च्या प्रमुखांनी एलॉन मस्क यांना फटकारले

नेमका प्रकार काय घडला?

चिक्ककोट्टीगेहळ्ळी गावात दोन दिवसांपासून बिबट्या फिरत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. अनेक प्रयत्नांनंतरही बिबट्याला पकडता आले नाही. गावकऱ्यांनी वनविभागाच्या सहाकऱ्याने लावलेल्या जाळ्यातूनही बिबट्या निसटला. वन विभागाने गावकऱ्यांच्या मदतीने बिबट्याला शोधण्याची मोहीम हाती घेतली. बिबट्याच्या पायांचे ठसे पाहून शोध पथक आणि गावकरी एका शेताजवळ पोहोचले. तिथे एका ठिकाणी बिबट्या आढळून आला. पण बिबट्याला असे अचानक समोर पाहून एकच धांदल उडाली.

बिबट्या समोर असल्यामुळे गावकऱ्यांनी पळापळ केली. यावेळी योगानंदने धाडसाने त्याला पकडले. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वन अधिकारी आणि ग्रामस्थ एका बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यावेळी योगानंदने चपळाईने बिबट्याच्या मागे जाऊन त्याची शेपटी धरली आणि त्याला पुन्हा पळून जाण्यापासून रोखले. त्यानंतर वनविभागाने बेबट्याला जेरबंद करत जंगलात सोडून दिले.

Story img Loader