स्वीडीशची पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हिने हवामान चळवळीविषयक कार्यक्रमात पॅलेस्टिनींनी समर्थन दिल्याचा आरोप एका व्यक्तीने केला आहे. त्यामुळे त्या व्यक्तीने ग्रेटाच्या हातातून माईक हिसकावण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. डचच्या राजधानीत हा प्रकार घडला आहे. ग्रेटाने पॅलेस्टानी-अफगाणी महिलेला व्यासपीठावर आमंत्रित केल्यानंतर एका व्यक्तीने व्यासपीठावर उडी मारली आणि कार्यक्रमात व्यत्यय आणला. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामानविषय कार्यक्रमाचे थनबर्गने राजकीय कार्यक्रमात रुपांतर केल्याचा आरोप या व्यक्तीने केला. “मी इथं हवामान चळवळीसाठी आलो होतो, राजकीय कार्यक्रमासाठी नाही”, असंही त्याने ग्रेटाला उद्देशून म्हटलं. व्यासपीठावर पोहोचताच त्याने थनबर्गकडून माईक काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्यात झटापटीही झाली. परंतु, व्यासपीठावरील इतर कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला बाजूला केले. यावेळी ग्रेटा स्वतः त्याला शांत होण्याचं आवाहन करत होती.

हेही वाचा >> गाझातील रुग्णालयात मृत्यूतांडव, वीज-पाणी-इंटरनेट खंडित; WHO कडूनही आता युद्धविरामाचे आवाहन

याबाबत ग्रेटा म्हणाली की, हवामान न्याय चळवळ म्हणून ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत आणि जे स्वातंत्र्यासाठी – न्यायासाठी लढत आहेत त्यांचा आवाज आम्हाला ऐकावा लागेल. अन्यथा, आंतरराष्ट्रीय एकजुटीशिवाय हवामान न्याय असू शकत नाही.

या कार्यक्रमात तिने पारंपारिक पॅलेस्टिनी स्कार्फ घातला होता. याला केफियेह म्हटलं जातं. ही घटना घडण्यापूर्वी जमावाकडून ‘पॅलेस्टाईन मुक्त होईल’ असा नारा दिला होता, असं वृत्त बीबीसीने दिलं आहे. तर, ‘नदीपासून समुद्रापर्यंत पॅलेस्टाईन मुक्त होईल’, असाही नारा दिल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. दरम्यान, या व्यक्तीची ओळख पटली नसून त्याच्या जॅकेटवर Natuurlijk असं लिहिलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man grabs mic from greta thunberg after she invites palestinian on stage sgk