मध्य प्रदेशातील नीमुच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने हुंड्यासाठी आपल्या पत्नीचा अमानुष छळ केला आहे. आरोपीनं हुंड्यांच्या पैशांसाठी पीडित महिलेचे हात बांधून तिला चक्क विहिरीत लटकावलं आहे. आरोपी पती एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने संबंधित घटनेचा व्हिडीओ शूट करून पीडितेच्या माहेरच्या लोकांना पाठवला आहे. हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना मध्य प्रदेशातील नीमुच येथे २० ऑगस्ट रोजी घडली. राकेश किर असं आरोपी पतीचं नाव आहे. आरोपी राकेश याने हुंड्याची मागणी करत आपल्या पत्नीचे हात बांधले आणि तिला विहिरीत लटकावलं. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने संबंधित सर्व घटना आपल्या मोबाईलमध्ये शूट केली. या घटनेचा व्हिडीओ आरोपीनं पीडितेच्या नातेवाईकांना पाठवला.

हेही वाचा- मुंबईत दोन सावत्र मुलांसह नवऱ्याकडून महिलेवर गँगरेप; तीन महिने सुरू होता अत्याचार, मोबाइलमध्ये आढळले ७०० व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी संबंधित गावातील काही लोकांना फोन करून घटनेची माहिती दिली. तसेच आमच्या मुलीला वाचवा, अशी विनंती केली. ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीनं तीन ते पाच लाख रुपयांची मागणी करत हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.