गुरुवारी पाटणाहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच बॉम्ब निकामी पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत विमानाची तपासणी करण्यात येत आहे. ज्या प्रवाशाने पाटणा विमानतळावर आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याची धमकी दिली होती, त्याची बॅग तपासली असता कोणताही बॉम्ब सापडला नाही. यानंतर आरोपी प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा- राजस्थानात महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचार ; महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर; राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाची आकडेवारी

विमानात बसल्यानंतर दिली बॅगेत बॉम्ब असल्याची माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पाटण्याहून दिल्ली

ला जाणाऱ्या विमानात ऋषी चंद सिंग बेदी नावाचा व्यक्ती आपल्या आई-वडीलांसोबत प्रवास करत होता. विमान उड्डाणाच्या काही मिनिटाअगोदरच त्याने आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याची धमकी दिली. या धमकीनंतर विमानातील इतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्याच्या बॅगेची तपासणी करण्यात आली मात्र, बॉम्ब मिळाला नाही. त्यानंतर ऋषी चंदला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.

हेही वाचा- अनेक पक्ष सोनियांच्या पाठिशी ; ‘ईडी’ चौकशीला जोरदार विरोध; तेलंगण राष्ट्र समितीही विरोधी गटात सामील

आरोपी प्रवाशाची कसून चौकशी

घटनेनंतर सगळ्या प्रवाशांना विमानाच्या खाली उतरवण्यात आले असून सामानांची तपासणी करण्यात येत आहे. बॉम्ब शोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले असून विमानाची कसून तपसणी करण्यात येत असल्याची माहिती पाटना विमानतळाचे अधीक्षक चंद्रशेखर सिंग यांनी दिली. तसेच ऋषी चंद हा मानसिक रोगी असल्यामुळे त्याने हे कृत्य केले. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे चंद्रशेखर सिंग म्हणाले.

Story img Loader