आपल्या इराणी प्रेयसीसोबत पणजी येथे सुट्टीसाठी आलेल्या अॅश्ले क्रास्टा या ३१ वर्षीय तरूणाने तिच्याच ४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी प्रेयसीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर अॅश्ले क्रास्टा या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मूळचा मुंबईचा रहिवासी असलेला क्रास्टा हा आपल्या प्रेयसीसोबत पणजीपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या अप्रोरा याठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी आला होता. २२ जानेवारी रोजी त्याची प्रेयसी काही वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गेली असता त्याने हे कृत्य केले. नंतर मुलीने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्यानतंर तिने स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या घटनेनंतर क्रास्टा हा अप्रोरा येथून पळून गेला होता. परंतू, तक्रार दाखल होताच त्याचा तपास करत पोलिसांनी त्याला अंजूना गावातून अटक केली.  
त्याच्यावर भारतीय कलम कायद्यानुसार कलम ३७६ (बलात्कार), ३७७ (अनैसर्गिक गुन्हा) आणि ३२३ (स्वेच्छेने जखमी करणारा) लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बाल लैंगिक संरक्षण गुन्हे कायद्यातील सेक्शन ४ आणि गोवा बाल कायद्यातील सेक्शन ८(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.