कन्हैयाकुमारचा आरोप,निवडणुकीत प्रचार करणार नाही
देशातील लोकशाही धोक्यात आली असल्याचा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार याने गुरुवारी केला. जातीयवाद व आर्थिक विषमता याविरुद्धचा आपला लढा सुरू राहील, असा निर्धार व्यक्त करणाऱ्या कन्हैयाने येत्या विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले.
रोहित वेमुलाप्रकरणी लढा देणाऱ्या हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत एकजूट व्यक्त करण्यासाठी आलेल्या कुमारला बुधवारी येथे प्रवेशास मनाई करण्यात आली होती. तो ‘घटनात्मक अधिकार’ या विषयावरील चर्चासत्रात
बोलत असताना प्रेक्षकातील
एकाने त्याच्यावर बूट फेकल्यामुळे कुमारला अप्रिय प्रसंगाचा सामना करावा लागला.
मार्क्सवादी, आंबेडकरवादी, समाजवादी, लोहियावादी किंवा केंद्रवादी या सर्वावर आज हल्ल्याचे सावट आहे, कारण लोकशाहीच धोक्यात आली आहे, असे कन्हैयाने चर्चासत्रात सांगितले. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असल्यानेच मी त्यांच्यावर टीका करीत असल्याचे सांगून, काळा पैसा परत आणणे, किमतींवर नियंत्रण ठेवणे आणि रोजगार पुरवणे याबाबत भाजपने दिलेल्या आश्वासनांचा उल्लेख करणारी कविता त्याने म्हणून दाखवली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा