फूटबॉल सामन्यावर लावलेल्या ५०० रुपयांच्या सट्ट्यावरून झालेल्या वादात एकाने गावकऱ्याचे मुंडके छाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आसामच्या सोनीतपूरमध्ये ही भयानक घटना घडली आहे. मुंडके छाटल्यानंतर तब्बल २५ किलोमीटर चालत जाऊन आरोपीने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

‘फिफा’ची भारतावर बंदी!; न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे निर्णय; कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद गमावले

१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी उत्तर आसाममधील सोनीतपूर जिल्ह्यातील एका गावात फूटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.  घटनेतील आरोपी तुनीराम माद्री या सामन्यातील एका संघाच्या बाजुने खेळत होता. तर मृत बोईला हेमराम दुसऱ्या संघाच्या बाजूने होता. हरणाऱ्या संघाने ५०० रुपये जिंकणाऱ्या संघाला देण्याचे सामन्यापूर्वी ठरवण्यात आले होते. पैज जिंकल्यानंतर हेमरामने माद्रीकडे पैशांसाठी तगादा लावला. मात्र, याकडे दुर्लक्ष करत माद्रीने हेमरामला जेवायला येण्यासाठी सांगितले. हेमराजकडून वारंवार होणाऱ्या पैशांच्या मागणीच्या रागातून माद्रीने हेमरामचे मुंडके छाटले.

AIFF Suspension Case: १७ वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषकाचे भवितव्य अधांतरीच; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पुढे ढकलली

हेमरामची हत्या केल्यानंतर माद्री त्याचे छाटलेले मुंडके आपल्या घरी घेऊन गेला. मोठ्या भावाने मारहाण करण्याचा प्रयत्न करताच माद्री घरातून पळाला. त्यानंतर छाटलेले मुंडके घेऊन तब्बल २५ किलोमीटर पायी चालत माद्रीने पोलीस ठाणे गाठले आणि आत्मसमर्पण केले. माद्रीकडून हत्येत वापरण्यात आलेला चाकू पोलिसांनी ताब्यात घेतला. कसून चौकशीनंतर माद्रीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाच्या सर्व पैलुंचा तपास सध्या पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Story img Loader