man Kidnapped as 7-Year-Old returns home after 30 years : वयाच्या सातव्या वर्षी अपहरण झालेला एक व्यक्ती तब्बल ३० वर्षांनंतर आपल्या घरी परतल्याची घटना दिल्लीजवळील गाझियाबाद येथे उजेडात आली आहे. या व्यक्तीचे नाव राजू (वय ३७ वर्ष) असून बहि‍णीबरोबर शाळेतून परत येताना त्याचे अपहरण करण्यात आले होते. साहिबाबाद येथील रहिवासी असलेला हा व्यक्ती ८ सप्टेंबर १९९३ या दिवशी गायब झाला होता. यासंबंधी कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली होती, मात्र त्याचा कसलाच सुगावा लागू शकला नाही. अखेर वयाच्या ३७ व्या वर्षी हा व्यक्ती स्वत:च्या घरी परतला आहे.

घरी परतल्यानंतर या व्यक्तीने सांगितले की, तो आणि त्याची बहीण शाळेतून परतत असताना त्याचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी राजूला राजस्थानला पाठवून दिले. तो इतकी वर्ष त्याच ठिकाणी होता. राजस्थानात पोहोचल्यानंतर त्याला दररोज मारहाण करून कामाला लावले जाई. त्या बदल्यात त्याला फक्त संध्याकाळी एक भाकर दिली जात असे. इतकेच नाही तर रात्री तो पळून जाऊ नये म्हणून त्याला बांधून ठेवण्यात येत असे.

50 lakh fake notes seized in Mira Road vasai news
मिरा रोड मध्ये ५० लाखांच्या बनावट नोटा जप्त; गुजराथ मधील तरुणाला अटक
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब

अखेर एका दिवशी त्याने स्वत:ची सुटका करून घेतली आणि दिल्लीला जाणाऱ्या एका ट्रकमध्ये चढला. त्याला दिल्ली शहर आठवत होते मात्र तो कोणत्या भागात राहायचा आणि त्याच्या आई-वडीलांची नावे काय होती हे मात्र तो विसरून गेला होता. राजधानी दिल्लीत पोहचल्यानंतर त्याने असंख्य पोलीस स्टेशनमध्ये फेऱ्या मारल्या, पण त्याला कुठलीही मदत मिळाली नाही.

हेही वाचा>> चार राज्यात बलात्कार, खून करणारा ‘सीरियल किलर’ गुजरातमध्ये जेरबंद; एकट्या महिलांना बनवायचा सावज

मात्र पाचएक दिवसांपूर्वी तो गाझियाबाद येथील खोडा पोलीस स्टेशनमध्ये पोहचला. त्याने सांगितलं की, येथील पोलिसांनी त्याची चांगली काळजी घेतली. तसेच त्याला शूज दिले, जेवण आणि पाण्याची व्यवस्था केली. यानंतर पोलीसांनी राजूबद्दलची माहिती माध्यमांमध्ये प्रसिद्ध केली. यानंतर काही वेळातच राजूच्या काकांनी पोलीसांशी संपर्क साधला आणि त्याचे कुटुंबिय त्याला घ्यायला आले. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी रजनीश उपाध्याय यांनी सांगितले.

दरम्यान तब्बल ३० वर्षांनी घरी परतलेल्या राजूने पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, “मला आता खूप बरे वाटत आहे”. तो पुढे बोलताना म्हणाला की, “मी भगवान हनुमानाचे आभार मानतो. माझ्या कुटुंबाशी पुन्हा भेट घडवून आणावी यासाठी मी त्यांच्याकडे सातत्याने प्रार्थना करत होतो”. पुढे बोलताना ३७ वर्षीय राजूने सांगितले की, ज्या व्यक्तीच्या घरी त्याला बंदी बनवून ठेवले होते, त्याच्या धाकट्या मुलीने त्याला भगवान हनुमानाची पूजा करण्यास सांगितले. तसेच त्याला पळून जाण्यास आणि आपल्या कुटुंबाचा शोध घेण्यास प्रोत्साहित केले.