मेक्सिकोमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या करून तिचा मेंदू ‘मेक्सिकन’ पदार्थात (Tocos) टाकून खाल्ला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने मृत महिलेच्या कवटीचा वापर ‘ॲशस्ट्रे’ (सिगारेटची राख साठवण्याचं लहान भांडं) म्हणून केला आहे. २९ जून रोजी ही धक्कादायक घटना घडली आहे. ३२ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
बिटीश वृत्तवाहिनी ‘मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना २९ जून रोजी घडली आहे. घटनेच्या दिवशी आरोपी पती अल्वारो हा ड्रग्जच्या नशेत होता. नशेत बेधुंद असताने त्याने पत्नी मारियाची निर्घृण हत्या केली. दोघांच्या लग्नाला अवघं एक वर्ष झालं होतं. या जोडप्याला आधीच्या लग्नातून पाच मुली आहेत. सर्वात लहान मुलगी १२ वर्षांची आहे तर सर्वात मोठी मुलगी २३ वर्षांची आहे.
आरोपी पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे केले आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरले. यातील काही तुकडे आरोपीनं दरीत फेकून दिले आणि बाकीचे तुकडे घरीच प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून ठेवले. हत्येच्या दोन दिवसानंतर आरोपीनं स्वत: आपल्या सावत्र मुलीला फोन करून खूनाची कबुली दिली. ‘तुझ्या आईचा खून केला आहे, तिच्या मृतदेहाचे तुकडे गोळा करून घेऊन जा’ असं आरोपीनं सावत्र मुलीला सांगितलं. यानंतर ही थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली.
हेही वाचा- धावत्या बसमध्ये कंडक्टरचा प्रवासी तरुणीबरोबर सेक्स, गैरवर्तनाचा VIDEO व्हायरल
एवढंच नव्हे तर आरोपीनं आपल्या दोन सावत्र मुलींचा लैंगिक छळ केला आहे. पीडित मुली आंघोळीला गेल्यावर आरोपी त्यांच्यावर नजर ठेवायचा. त्यांना मारहाण करून त्यांचा लैंगिक छळ करायचा, अशी माहिती पीडित मुलींच्या आजीने दिली. आरोपी हा मद्यपी असून तो ड्रग्जच्या आहारी गेला होता, असंही पीडित कुटुंबाने सांगितलं.