Crime News : उत्तर प्रदेश येथे एका व्यक्तीने स्वतःच्याच मित्राची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फिरोजाबाद जिल्ह्यातील ऐकायला आणि बोलायला न येणार्‍या एका ३४ वर्षीय दिव्यांग व्यक्तीने दारूच्या नशेत मित्राची गळा आवळून हत्या केली. या घटनेनंतर पोलिसांच्या तपासानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

आरोपीचे नाव राजकुमार सिंह असून त्याने सोनी सिंह (२५) याच्या हत्येनंतर त्याचा शिरछेद केला, इतकेच नाही तर त्याचे मुंडनही केले. रागाच्या भरात केलेल्या या भयानक कृत्यानंतर त्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मित्राचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न देखील केला. या भीषण हत्याकांडाबद्दल गुरूवारी पोलिसांनी माहिती दिली.

नेमकं काय झालं?

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद येथील मगरघाटी भागात एक डोके नसलेला मृतदेह आढळून आल्याचा फोन पोलिसांना आल्याने १५ फेब्रुवारी रोजी ही धक्कादायक घटना उजेडात आली. पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि हा मृतदेह शवच्छेदन तपासणीसाठी पाठवण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार राजकुमार आणि सोनू हे दोघे मजूर आहेत आणि तब्बल सहा वर्षांपासून शेजारी राहातात. १४ फेब्रुवारीच्या रात्री एकत्र बसून मद्य घेत असताना सोनूने राजकुमार याच्याकडून ५०० रूपयांची नोट घेतल्याने त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला. या वादाचा शेवट राजकुमार याने गळा आवळून खून करण्यात झाला.

हेही वाचा
Delhi Lady Don Arrested : ड्रग्ज, पार्ट्या आणि हत्या… दिल्लीच्या ‘लेडी डॉन’चे दिवस अखेर भरले! १ कोटी रुपये किमतीच्या हेरॉईनसह अटक

असा सापडला आरोपी

संतापाच्या भरात राजकुमारने सोनूचा गळा आवळून खून केला, असे फिरोजपूर शहरचे एसपी रवी शंकर प्रसाद यांनी गुरूवारी सांगितले. पोलिसांनी परिसरातील जवजवळ १०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि आरोपीला शोधून काढले असेही त्यांनी सांगितले. राजकुमार याच्याविरोधात पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या १०३(१) अंतर्गत खूनाचा गुन्हा नोंदवला आहे. तसेच त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader