एका हातात पत्नीचं कापलेलं शीर आणि दुसऱ्या हातात विळा घेऊन एक माणूस रस्त्यावर फिरत होता. बस स्टॉपवर फिरणाऱ्या या माणसाला अटक करण्यात आली आहे. रक्ताने माखलेलं मुंडकं घेऊन हा माणूस फिरत होता. हे दृश्य पाहून लोक घाबरले. १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. या आरोपीचं नाव गौतम आहे अशी माहिती समोर आली आहे.
कुठे घडली ही घटना?
पश्चिम बंगालच्या मेदिनीपूर भागात ही घटना घडली आहे. आरोपीचं नाव गौतम गुच्छेत असं आहे. १४ फेब्रुवारीच्या दिवशी वसंत पंचमी होती त्यामुळे लोक सरस्वती पूजनाची तयारी करत होते. त्यावेळी अचानक गौतम गुच्छेत त्याच्या पत्नीचं कापलेलं शीर हातात घेऊन आला. त्याच्या एका हातात पत्नीचं शीर होतं आणि दुसऱ्या हातात विळा. त्याचा हा अवतार पाहून लोक चांगलेच घाबरले. कारण बस स्टॉपवर उभा राहून तो जोरजोरात ओरडत होता. त्यामुळे लोक घाबरले होते, मात्र पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
हे पण वाचा- धक्कादायक! कॅलिफोर्नियातल्या घरात भारतीय कुटुंब मृतावस्थेत आढळलं, बंदुकीच्या गोळ्या झाडल्याच्या खुणा
घटनेचा व्हिडीओ व्हायरल
पोलिसांनी गौतम गुच्छेतला अटक केली. मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गौतम गुच्छेतने त्याच्या पत्नीला ठार केलं. त्यानंतर तिचं कापलेलं शीर घेऊन तो फिरत होता. पोलिसांनी गौतम गुच्छेतला अटक केली आणि त्यानंतर त्याच्या पत्नीचं आणि मृतदेह दोन्ही ताब्यात घेतलं. गौतमच्या मृतपत्नीचं नाव फुलरानी होतं. तिला त्याने ठार केलं आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं या प्रकरणात गौतमच्या आई वडिलांनाही अटक करण्यात आली आहे. तसंच गौतम गुच्छेत हा मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे अशीही माहिती समोर आली आहे.
तीन वर्षांपूर्वी गौतम गुच्छेत हा कोलकाता येथील अलीपूर भागात असलेल्या प्राणीसंग्रहालयातल्या वाघाच्या पिंजऱ्यातही उतरला होता. १४ फुटांची भिंत चढून तो पिंजऱ्यात उतरला होता अशीही माहिती समोर येते आहे. एनडीटीव्हीने या विषयीचं वृत्त दिलं आहे.