एका अल्पवयीन मुलीवर नराधमाने तीन दिवस बलात्कार केला. त्यानंतर तिचा शारिरीक छळ केला तसंच तिच्या चेहऱ्यावर तापलेल्या लोखंडी रॉडने नाव लिहिलं. अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना समोर आली आहे. अमन हे नाव लोखंडी रोडने अमन हे नाव लिहिलं. पीडित मुलीने लग्नाला नकार दिल्याने या माणसाने तीन दिवस या मुलीवर बलात्कार केला.

कुठे घडली आहे ही धक्कादायक घटना?

उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खेरी या ठिकाणी ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी २२ वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. त्याचं नाव अमन आहे. POCSO अंतर्गत या अमनला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या FIR मध्ये ही माहिती आहे. पीडित मुलीच्या कुटुंबाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तसंच पोलिसांनी या मुलीचं व्हिडीओ स्टेटमेंटही रेकॉर्ड केलं आहे. पोलीस अधीक्षक गणेश शाह यांनी ही माहिती दिली.

RG Kar Rape-Murder Case
RG Kar Rape-Murder Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात मोठी अपडेट! पीडितेच्या वकिलाची खटल्यातून माघार; सांगितलं ‘हे’ कारण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
minor girl sexually assaulted Vadgaon Maval Sessions Court sentenced accused to 20 years of hard labor and fine
पिंपरी : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला सक्तमजुरी
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
school girl and her brother molested by minors who threatened to kill her
जिवे मारण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य, अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल

हे पण वाचा- विवाहाच्या आमिषाने चौदा वर्षीय मुलीचे अपहरण करुन बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमनने शाळा सोडून दिली आणि तो सलूनमध्ये काम करत होता. हे सलून हैदराबाद या ठिकाणी आहे. त्याने पीडित मुलीला लग्नाची मागणी घातली. मात्र या मुलीने लग्नाला नकार दिला. त्यानंतर या मुलीवर तीन दिवस बलात्कार केला. त्यानंतर तिच्या गालावर अमन हे नाव लिहिलं. आता आम्ही या अमन विरोधात कलम ३२४ आणि कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलीस अधिकारी दिनेश सिंग यांनी दिली आहे. टाइम्स नाऊ यांनी ही माहिती दिली आहे.

Story img Loader