राजधानी दिल्लीतील बुलंद मशीद परिसरात एका २२ वर्षीय विवाहितेवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी २३ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. आरोपी तरुण हा पीडितेच्या ओळखीचा असून दोघंही एकमेकांच्या घराशेजारी राहायचे. पीडित तरुणीचं चार महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं, यामुळे नाराज असलेल्या तरुणाने हैदराबादहून दिल्लीला जात महिलेवर जीवघेणा हल्ला केला, याबाबतची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, हसमत जहाँ असं पीडित महिलेचं नाव आहे. तर शाह बाबू असं २३ वर्षीय आरोपीचं नाव आहे. घटनेच्या दिवशी आरोपी शाह बाबू पीडित महिलेला भेटण्यासाठी दिल्लीला आला होता. पीडितेशी बोलत असताना शहा बाबूला संताप अनावर झाला आणि त्याने पीडितेवर चाकूने हल्ला केला. यामध्ये पीडितेच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि हातावर जखमा झाल्या.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
Murder of woman in Hadapsar area body was kept in bed compartment
हडपसर भागात महिलेचा खून, मृतदेह पलंगातील कप्यात ठेवल्याचे उघड
girl died while removing akash kandil
आकाशकंदिल काढताना तोल गेला, ११ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू
Child dies in husband-wife fight Crime of culpable homicide against man
पतीने रागाच्‍या भरात पत्‍नीला मारली लाथ, कडेवरील चिमुकलीचा खाली पडून…

हेही वाचा- घरात घुसून महाविद्यालयीन तरुणीचा चिरला गळा, आई-वडील घराबाहेर असताना घडला प्रकार

या घटनेबद्दल अधिक तपशील देताना पोलीस उपायुक्त (ईशान्य) जॉय तिर्की म्हणाले की, आम्हाला दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी एका महिलेवर चाकूने वार केल्याची माहिती मिळाली. हसमत जहाँ यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि हातावर चाकूने अनेक वार करण्यात आले होते. त्यांना तातडीने ‘जग प्रवेश चंद्र’ रुग्णालयात नेण्यात आलं. तेथून त्यांना जीटीबी रुग्णालयात हलवण्यात आलं. याठिकाणी पीडितेवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आरोपी शाह बाबूला घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला.

हेही वाचा- मुंबईतील घर, कार्यालयांमध्ये चोरी करणारी गुजरातमधील महिलांची टोळी गजाआड

पोलीस उपायुक्त तिर्की यांनी पुढे सांगितलं की, “पीडित हसमत जहाँने चार महिन्यांपूर्वी मोहम्मद मुन्ना नावाच्या तरुणाबरोबर लग्न केलं होतं. यामुळे आरोपी शाह बाबू तिच्यावर नाराज झाला होता. शाह बाबू हैदराबादमध्ये टेलरिंगचं काम करतो. घटनेच्या दिवशी तो पीडितेला भेटण्यासाठी दिल्लीला आला. यावेळी तिच्याशी बोलताना आरोपीचा संयम सुटला आणि त्याने तिच्यावर चाकूने अनेक वेळा वार केले.”