श्रद्धा वालकर या तरुणीच्या हत्येने देशात खळबळ उडाली आहे. तिचा प्रियकर आफताब पूनावाला याने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याचं समोर आलं होतं. त्यात आता उत्तरप्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली. पत्नीने दुसऱ्यांदा शरीरसंबंधास नकार दिल्याने ३० वर्षीय महिलेचा खून करण्यात आला आहे.
उत्तरप्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातून ही घटना घडली आहे. याप्रकरणी मोहम्मद अन्वर ( ३४ वर्षीय ) आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर, मृत पत्नीचे नाव रुखसार आहे. रुखसार आणि अन्वर यांचा २०१३ साली विवाह झाला होता. त्यांना तीन मुले आहेत. अन्वर हा बेकरी चालवत असे.
हेही वाचा : “…तर माझी मुलगी जिवंत असती”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी
मोहम्मद अन्वरने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पत्नीला शरीर संबंध ठेवण्यासाठी उठवले. काही वेळानंतर त्याला पुन्हा शरीरसंबंध ठेवायचे होते. पण, त्याच्या पत्नीने त्यास नकार दिला. यावरून दोघांत वाद झाला. या वादानंतर रागाच्या भरात अन्वरने पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केला. खून केल्यावर पत्नीचा मृतदेह पोत्यात घालून ५० किलोमीटर अंतरावर फेकून दिला. यानंतर मंगळवारी सकाळी अन्वरने पत्नी बेपत्ती झाल्याची तक्रार दाखल केली.
त्यातच मंगळवारी ठाकूरद्वारा येथील रतुपुरा गावाजवळ पोलिसांना एका महिलेचा अनोळखी मृतदेह सापडला. त्यावरून ठाकूरद्वारा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर, मृतदेहाचे फोटो जवळील पोलीस ठाण्यात पाठवण्यात आली. अमरोहा येथे एक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावरून मुरादाबाद पोलिसांनी अन्वरला मृतदेहाच्या ओळखीसाठी बोलावलं. अन्वरने मृतदेह पत्नीचा असल्याचं ओळखलं. पण, चौकशीवेळी पोलीशी खाक्या दाखवल्यावर अन्वरने गुन्ह्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
ठाकूरद्वाराचे पोलीस अधिकारी अर्पित कपूर म्हणाले की, अन्वरने चौकशीदरम्यान रुखसारचा खून केल्याचं मान्य केलं. तो तिच्या वागण्याने नाराज होता आणि सतत मारहाण करायचा. सोमवारी दुसऱ्यांदा शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यावर त्याने तिचा दोरीने गळा आवळून खून केला, असं कपूर यांनी म्हटलं.