मुंबई विमानतळावर सुरक्षा जवानांमुळे एका प्रवाशाचे प्राण वाचले आहेत. प्रवाशाला विमानतळावर असतानाच ह्रदयविकाराचा आला होता. मात्र सीआयएसएफ सहाय्यक उपनिरीक्षक मोहित शर्मा आणि इतर दोन जवानांनी प्रसंगावधान दाखवत प्रवाशाचे प्राण वाचवले. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोहित शर्मा आणि जवानांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 28 ऑक्टोबरची ही घटना आहे.
व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रवासी खाली जमिनीवर पडतो. सुरुवातीला कोणालाही नेमकं काय झालं आहे काहीच कळत नाही. तिथे उभे असणारे लोक देखील घाबरतात. नेमकं काय करावं कोणाला काहीच कळत नव्हतं. त्याचवेळी मोहित शर्मा इतर दोन जवानांसोबत तिथे येतात आणि प्रवाशाचा जीव वाचवतात.
#WATCH: CISF ASI Mohit Kumar Sharma along with two other CISF personnel gave Cardiopulmonary resuscitation (CPR) to a passenger who suffered cardiac arrest at Mumbai Airport on Oct 26. The passenger was later shift to Nanavati Hospital & his condition is stable now. pic.twitter.com/cAEmBTaZfF
— ANI (@ANI) October 28, 2018
ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर सुरक्षा अधिकारी मोहित कुमार शर्मा आपल्या दोन जवानांसोबत तिथे पोहोचतात आणि सीपीआर देण्यास सुरुवात करतात. ज्यांना ह्रदयविकाराचा झटका आला त्यांचं नाव सत्यनारायण असल्याची माहिती मिळाली आहे. ते आंध्र प्रदेशचे रहिवासी आहेत. सत्यनारायण मुंबईहून हैदराबादला जात आहेत. टर्मिनल 2 वर असतानाच अचानक त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते खाली पडले.
यानंतर लगेचच मोहित शर्मा तिथे पोहोचले आणि सीपीआर देण्यास सुरुवात केली. यानंतर सत्यनारायण यांनी नानावटी रुग्णालयात भर्ती करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, दरम्यान मोहित शर्मा आणि त्यांच्या जवानांचं प्रसंगावधान दाखवल्याबद्दल कौतूक होत आहे.