मध्य प्रदेशातील इंदूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका तरुणाने मुस्लीम तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पीडित तरुणीने लग्नास नकार दिल्याने आरोपीनं तिचे ३५ तुकडे करण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी बणगंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. शुभम कुमार असं अटक केलल्या आरोपीचं नाव आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी शुभमला अटक केली. पोलिसांनी आरोपींवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३२३, ३७६ (२) (एन), ४५४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

हेही वाचा- नाशिक: मुलीचा खून करणाऱ्या पित्यास अटक

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, आरोपीनं पीडित तरुणीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच्याशी लग्न न केल्यास तिचे ३५ तुकडे करण्याची धमकी दिली. मागील काही दिवसांपासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे.

हेही वाचा- भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याची जीभ घसरली; थेट शिवी देत काँग्रेस नेत्यावर टीका, VIDEO व्हायरल

इंदूरचे अतिरिक्त डीसीपी राजेश रघुवंशी यांनी सांगितले की, आरोपीला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.