Crime News : लग्न जुळवली जात असताना फसवणूक झाल्याच्या अनेक घटना सतत समोर येत असतता. असाच एक धक्कादायक प्रकार मेरठच्या ब्रह्मपुरी येथील २२ वर्ष वय असलेल्या मोहम्मद अजीम याच्याबरोबर घडला आहे. गेल्या आठवड्यात अझीम हा त्याच्या निकाह सोहळ्यासाठी पोहचला होता. पण यादरम्यान त्याला चांगलाच धक्का बसला, करण त्याचं लग्न हे त्याला दाखवण्यात आलेल्या मुली ऐवजी तिची ४५ वर्षीय विधवा आई म्हणजेच त्याची होणारी सासू ताहिराशी लावण्यात आलं होतं.

या संपूर्ण घटनेबद्दल अजीमने पोलिसांना सांगितले की, त्याचा मोठा भाऊ नदीम आणि मेहुणी शैदा यांनी त्याचे लग्न शैदाची २१ वर्षीय भाची मंताशा हिच्याशी ठरवले होते, जी कांकेरखेरा येथील फाजलपूर येथील रहिवासी आहे. मात्र या लग्नाची प्रक्रिया सुरू असताना मौलवीने वधूचे नाव ताहिरा असं घेतलं आणि अजीमला संशय आला.

“तिचा चेहरा पहिल्यानंतर माझा त्यावर विश्वासच बसला नाही. ती मंताशा नव्हती- तिची आई होती,” असे अजीमने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

बलात्काराचा आरोप करण्याची धमकी

आपल्याला फसवले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर जेव्हा त्याने लग्न करण्यास किंवा वधूला घरी घेऊन जाण्यास नकार दिला, तेव्हा त्याचा भाऊ आणि मेव्हणीने त्याच्यावर बलात्काराचा खोट्या आरोपात अडकवण्याची धमकी दिल्याचेही अजीमने सांगितले. काय होईल याची भीती मनात घेऊन तो एकटाच घरी परतला आणि नंतर गुरुवारी मेरठमधील एसएसपी कार्यालयात याप्रकरणी तक्रार दाखल केली.

एसएसपी मेरठ डॉ. विपिन ताडा यांनी अशी तक्रार मिळल्याची पुष्टी केली आहे. “आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहोत आणि त्यामध्ये आढळलेल्या माहितीनुसार योग्य अशी कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले. दरम्यान य प्रकरणाची चौकशी केली जात आहे.