गुवाहाटीहून अगरतळाला जाणाऱ्या विमानात एका प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित प्रवाशाने अमली पदार्थांच्या नशेत विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. यानंतर सहप्रवाशांनी संबंधित प्रवाशाला मागे खेचत मारहाण केली. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गुरुवारी गुवाहाटीहून अगरतळाला येणाऱ्या इंडिगो फ्लाइटमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर विमानात एकच गोंधळ उडाला. यावेळी संबंधित प्रवाशाने अमली पदार्थांचं सेवन केल्याचा आरोप आहे.

Plane Crashes In Philadelphia
US Plane Crash : अमेरिकेत भीषण विमान अपघात; टेकऑफनंतर ३० सेकंदातच विमान कोसळलं, अनेक घरांना लागली आग
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Passanger records air hostess skirt video in flight vulgar video viral on social media
“अरे हिंमतच कशी होते?”, विमानात हवाईसुंदरीच्या स्कर्टचा काढला VIDEO, प्रवाशाचं संतापजनक कृत्य व्हायरल
Washington DC Plane Crash USA
US Plane Crash : अमेरिकेत ६४ प्रवाशांना घेऊन निघालेल्या विमानाची लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडक, ३० मृतदेह सापडले
South Sudan Plane Crash
Plane Crash : दक्षिण सुदानमध्ये भीषण विमान अपघात, २१ जणांपैकी फक्त एकजण वाचला; मृतांमध्ये भारतीय नागरिकाचाही समावेश
‘एनव्हीएस-०२’चे आज उड्डाण
Air India passengers create ruckus after got stranded in Mumbai-Dubai flight
Air Indiaच्या विमानात ५ तास अडकून पडले प्रवासी, खाली उतरवण्यासाठी घातला गोंधळ; व्हायरल होतोय Video
Fight video Woman abuses and beat ola cab driver for missing her flight at mumbai airport viral video
“तिची हिंमत कशी झाली…” आधी शिवीगाळ मग लाथा-बुक्क्यांनी मारहाण, फ्लाइट चुकली म्हणून महिलेने कॅबचालकाला दिला चोप, संतापजनक VIDEO व्हायरल

हेही वाचा- नागपूर मेट्रोत तरुणाने ‘बेकरार करके हमे’चा सीन केला रिक्रिएट, भन्नाट डान्सचा VIDEO VIRAL

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत विमानाचे क्रू मेंबर्स आणि इतर काही प्रवासी आरोपी तरुणाला धरून ठेवताना दिसत आहे. आरोपी तरुणाचे कपडे फाटल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. या गोंधळानंतर एका पुरुष क्रू मेंबरने संबंधित प्रवाशाला ओढत दुसरीकडे नेलं. यावेळी संतापलेल्या काही प्रवाशांनी आरोपीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पण क्रू मेंबर्संनी मारहाण न करण्याची विनंती केली.

त्रिपुरा पोलिसांचे प्रवक्ते ज्योतिस्मान दास चौधरी यांनी सांगितलं की, ४१ वर्षीय आरोपी देवनाथ हा गुवाहाटी-अगरतळा इंडिगो फ्लाइटमध्ये होता. त्याने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सतर्क झालेल्या इतर प्रवाशांनी आरोपीला मागे खेचले. या प्रकारानंतर क्रू मेंबर्सनी आरोपी देवनाथ याला त्याच्या जागेवर जाऊन बसण्याची विनंती केली. पण त्याने क्रू मेंबर्सशी गैरवर्तन केलं. अगरतळा विमानतळावर विमान उतरल्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रवाशाला अटक केली आहे. याबाबतचं वृत्त ‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलं आहे.

Story img Loader