मालाबार एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेची छेडछाड करणाऱ्या मद्यधुंद युवकांना एका तरुणाने बुधवारी अटकाव केला. यामुळे संतप्त झालेल्या युवकांनी त्याला मारहाण केली तसेच गंभीर जखमी अवस्थेत त्याला चेरुथुरतीनजीक चालत्या गाडीतून बाहेर फेकले. तो बेशुद्ध अवस्थेत रेल्वे मार्गात पडलेला पोलिसांना  आढळला. त्याचे दोन्ही हात तुटले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा तरुण इडुक्की जिल्ह्य़ातून मंगळूरजवळील मुक्काम्बिका देवीच्या दर्शनाला जात असताना हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Story img Loader