मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. येथील एका मुजोर तरुणाने एका गरीब मजुराच्या अंगावर लघुशंका केली आहे. आरोपीनं पीडित तरुणाच्या अंगावर, तोंडावर आणि डोक्यावर लघवी केली आहे. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पीडित व्यक्ती आदिवासी समाजातील असून ती मजुरीचं काम करते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, प्रवेश शुक्ला असं आरोपीचं नाव आहे. आरोपीविरोधात सिधी येथील स्थानिक पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम २९४ आणि ५०४ आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या व्हिडीओची दखल घेतली आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करावी. तसेच आरोपीविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) नुसार कठोर कारवाई करावी, असा आदेश मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिला.

शिवराज सिंह चौहान यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की,”सिधी जिल्ह्याचा एक व्हायरल व्हिडीओ माझ्या निदर्शनास आला आहे. दोषीला अटक करून कठोर कारवाई करण्याचे आणि एनएसए लागू करण्याचे आदेश मी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

हेही वाचा- धावत्या बसमध्ये कंडक्टरचा प्रवासी तरुणीबरोबर सेक्स, गैरवर्तनाचा VIDEO व्हायरल

मध्य प्रदेशातील विरोधी पक्षनेत्यांनीही या व्हिडीओवरून तीव्र टीका केली. माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले, “एवढ्या घृणास्पद आणि विकृत कृतीला सुसंस्कृत समाजात थारा नाही. मध्य प्रदेशातील आदिवासींवर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man urinating on tribal labourer viral video from madhya pradesh rmm