प्रत्येक कंपनीची कर्मचारी नियुक्त करण्याची पद्धत वेगळी असते. सातत्याने कर्मचारी नियुक्त करावे लागत असतील तर त्यासाठी यंत्रणा राबवावी लागते. एका कंपनीत सातत्याने अर्ज येऊन एकही कर्मचारी नियुक्त करण्यात न आल्याने शेवटी व्यवस्थापकाने एक युक्ती केली. या युक्तीमुळे एचआर विभागातील त्रुटी दिसून आल्या असून एचआरलाच कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

रेडिटवर या कंपनीच्या व्यवस्थापकाने हा संपूर्ण प्रकार सांगितला आहे. एका पदासाठी कर्मचारी नियुक्ती करायचे होते. परंतु, गेले तीन महिन्यांपासून एकाही कर्मचाऱ्याची निवड झाली नाही. त्यामुळे व्यवस्थापकाकडून याबाबत सातत्याने विचारणा केली जात होती. परंतु, एकही उमेदवार निवड प्रक्रियेत उत्तर्ण न झाल्याने कर्मचाऱ्याने निवडले नसल्याचं सांगितलं गेलं. अखेर व्यवस्थापकाने एक युक्ती केली. त्यांनी नाव बदलून व्यवस्थापकाने स्वतःचा बायोडेटा सादर केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे व्यवस्थापकाचा रेझ्युमे एचआर टीमपर्यंत पोहोचण्याआधीच काही सेकंदात नाकारण्यात आला. हा रिझ्युमे ऑटो रिजेक्टेड करण्यात आला होता. एचआरने माझ्या सीव्हीकडे पाहिलेही नाही, असं ते म्हणाले. या प्रकारामुळे व्यवस्थापकाला एचआर टीमच्या नियुक्ती प्रक्रियेत एक मोठी त्रुटी आढळली.

अँगुलरजेएस पदासाठी या कंपनीकडून उदमेवार निवडले जात होते. त्यासाठी एटीएस ही यंत्रणा वापरली जाते. अँगुलरमध्ये प्राविण्य मिळवलेल्या उमेदवाराचा शोध घेतला जात होता. परंतु, या यंत्रणेतील त्रुटीमुळे उमेदवारांचे सीव्ही आपोआप नाकारले जात होते. पण या त्रुटीची माहिती एचआर विभागाला माहिती नव्हती. म्हणून एचआरला कामावरून काढून टाकण्यात आलं. तसंच, या विभागातील कर्मचाऱ्यांनाही कामावरून काढून टाकण्यात येणार आहे.