कृष्णवंशीयांवरील अन्यायाविरोधात लढणारे दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांची प्रकृती खालावल्याने शनिवारी त्यांना प्रिटोरिया येथील लष्करी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती विद्यमान अध्यक्ष जेकब झुमा यांच्या कार्यालयातून देण्यात आली. ९४ वर्षीय मंडेला यांची तपासणी करण्यात आली असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना काही दिवस ठेवण्यात येणारआहे. त्यांची प्रकृती स्थिर असून, उपचारांना प्रतिसाद देत आहेत. वयोमानानुसार त्यांची प्रकृती ढासळली असून, रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उत्तम औषधोपचार होत आहेत. त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून, लवकरच ते ठणठणीत बरे होतील, असे राष्ट्रपती कार्यालयाचे प्रवक्ते मॅक महाराज यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 10th Dec 2012 रोजी प्रकाशित
मंडेला रुग्णालयामध्ये जोहान्सबर्ग
कृष्णवंशीयांवरील अन्यायाविरोधात लढणारे दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांची प्रकृती खालावल्याने शनिवारी त्यांना प्रिटोरिया येथील लष्करी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती विद्यमान अध्यक्ष जेकब झुमा यांच्या कार्यालयातून देण्यात आली.
First published on: 10-12-2012 at 01:09 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mandela hospitalised