वर्णभेदविरोधी नेते नेल्सन मंडेला यांची प्रकृती गेले काही दिवस खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थनाही करत आहेत. याच प्रार्थना आणि प्रेमामुळे मंडेलांच्या प्रकृतीत सुधारणाही होत आहे. या आपलेपणामुळे मंडेलांच्या पत्नी ग्रेका माशेल यांनी देशभरातील नागरिकांचे सदिच्छा व प्रार्थनेसाठी आभार मानले आहेत. नागरिकांच्या प्रेमामुळेच आपली चिंता कमी होत असल्याचे ग्रेका यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेतील नागरिक तसेच जगातील इतर स्तराकडून मिळालेले प्रेम व शांती यांचे मी सध्या धन्यवाद मानते, असे ग्रेका माशेल यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे.
गेले दोन दिवस मंडेला यांची प्रकृती गंभीर आहे. मात्र मंडेला यांच्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते आपल्या परिवारासोबत एकत्र राहू शकत असल्याचे दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांनी सांगितले. गेल्या शनिवारी मंडेला यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डिसेंबरपासून रुग्णालयात जाण्याची त्यांची ही चौथी वेळ आहे.  मंडेलांना फुप्फुसांचा आजार फार जुना असून त्यांना रंगभेदाच्या वेळी राजनैतिक कैदी म्हणून अटक केल्यापासूनचा हा आजार आहे. डिसेंबर महिन्यात त्यांना फुप्फुसातील संसर्ग व पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेकरिता १८ दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले होते. १९९० साली तुरुंगातून सुटका झाल्यापासून त्यांचा रुग्णालयात राहण्याचा हा सर्वाधिक काळ होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा