शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य वाढीस लागावे म्हणून अनारोग्यकारक अशा ‘जंक फूड’वर बंदी घालण्यात येणार असल्याचे संकेत महिला व बालविकासमंत्री मेनका गांधी यांनी बुधवारी येथे दिले.
शाळांमधील उपाहारगृहांमध्ये मुलांना चांगल्या दर्जाचे आणि सुरक्षित अन्न उपलब्ध व्हावे, हा त्यामागचा हेतू असल्याचे गांधी म्हणाल्या. ‘जंक फूड’ काय आहे आणि ते आरोग्यास कशा प्रकारे घातक आहे, हे मुलांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असाही विचार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोग्य आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयासमवेत या मुद्दय़ावर चर्चा करण्याचा गांधी यांचा विचार आहे. यासंदर्भात आणखीही खात्यांसमवेत त्या चर्चा करतील.

Story img Loader