कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये झालेल्या ऑटोमधील स्फोटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी ‘आयसीस’ या दहशतवादी गटापासून प्रेरित होता, तसेच त्याने हँडलर्सशी संपर्क साधण्यासाठी ‘डार्क वेब’चा वापर केला होता, असा खुलासा कर्नाटक पोलिसांनी केला आहे. “आरोपी शरीक अनेक हँडलर्सच्या हाताखाली काम करत होता. त्यापैकी एक हँडलर ‘अल हिंद’ या दहशतवादी संघटनेचा सदस्य होता”, अशी माहिती कर्नाटकातील पोलीस अधिकारी आलोक कुमार यांनी दिली आहे.
आरोपीने घरीच बॉम्ब बनवले होते. शिवमोगा नदी काठावर ट्रायल बॉम्बस्फोटदेखील केले होते, अशी माहिती या पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. “दोन खटल्यांमधील आरोपी अराफत अली शरीकचा हँडलर होता. अली ‘अल हिंद’ मॉड्यूल प्रकरणातील आरोपी मुस्सवीर हुसेन यांच्या संपर्कात होता. अब्दुल मतीन ताहा हादेखील शरीकचा मुख्य हँडलर होता”, असं कुमार यांनी सांगितलं आहे.
Shraddha Murder Case: आफताबची नार्को टेस्ट रद्द, नेमकं काय घडलंय?
शरीकच्या म्हैसुरमधील घरासह कर्नाटकातील सात ठिकाणी या प्रकरणात पोलिसांनी शोधमोहिम राबवली आहे. शरीकच्या घरातून बॉम्ब बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. १९ नोव्हेंबरला नदीकाठावर केलेल्या ट्रायल बॉम्बस्फोटानंतर शरीकच्या दोन साथिदारांना पोलिसांनी अटक केली. मात्र, त्यावेळी शरीक घटनास्थळावरुन फरार झाला. त्याने चोरलेल्या आधार कार्डच्या आधारे म्हैसुरमध्ये भाड्याने घर घेतले आणि याठिकाणी बॉम्ब बनवले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, शरीकशी संपर्कात असलेल्या एका व्यक्तीला कोइम्बतूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. या व्यक्तीने सिम कार्ड घेण्यासाठी शरीकला त्याचे आधार कार्ड दिले होते.
Pune Truck Accident: टँकरचे ब्रेक फेल झालेच नव्हते, RTO तपासात मोठा खुलासा, पोलीस म्हणाले “चालकाने…”
दरम्यान, पोलिसांच्या पाच पथकांकडून विविध ठिकाणांवर या घटनेचा तपास केला जात आहे. “शिवमोगा जिल्ह्यातील तिर्थहल्ली शहरातील चार आणि मंगळुरू शहरातील एका ठिकाणाची आज सकाळी झडती घेण्यात आली. आत्तापर्यंत सात ठिकाणांवर पोलिसांनी शोधमोहीम राबवली असून काही इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे”, अशी माहिती एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.