भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी काँग्रेसच्या बैठकीत चहा देतील, पण पंतप्रधान होऊ शकत नाहीत असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठक सुरू होण्याआधी पत्रकारांशी बोलताना केले.
मणिशंकर अय्यर म्हणाले की, मी तुम्हाला विश्वासपूर्णतेने सांगू शकतो की मोदी हे देशाचे पंतप्रधान कधीच होऊ शकत नाहीत. काँग्रेसच्या बैठकीदरम्यान, त्यांना चहाचा स्टॉल लावण्याची इच्छा असेल तर ते तसे करू शकतात. बैठकीत चहा वाटू शकतात” असे म्हणत नरेंद्र मोदींवर सडेतोड टीका केली.
अय्यर यांच्या या वक्तव्यावर भाजपने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. निवडणुकीत होणाऱया पराभवाला घाबरून काँग्रेस नेते अशी वक्तव्य करत आहेत असे भाजपने म्हटले आहे.

Story img Loader