पीटीआय, रांची
इंडिया महाआघाडीने मंगळवारी झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये तरुणांना १० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच गरीबांना १५ लाख रुपयांच्या आरोग्यविम्याचे संरक्षण दिले जाईल असेही सांगितले आहे. इंडिया आघाडीने एकूण ७ हमींचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
या ७ हमींमध्ये वंचित समाजगटांसाठी आरक्षणाचेही आश्वासन देण्यात आले आहे. त्यामध्ये राज्यात सत्तेवर आल्यास अनुसूचित जातींसाठी २८ टक्के (सध्या २६ टक्के), अनुसूचित जमातींसाठी १२ टक्के (सध्या १० टक्के) आणि इतर मागासवर्गीयांसाठी २७ टक्के (सध्या १४ टक्के) आरक्षण देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि राष्ट्रीय जनता दलाचे जे पी यादव यांनी संयुक्तरित्या जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी खरगे म्हणाले की, ‘‘जेव्हा कधी आम्ही हमींविषयी बोलतो तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी तातडीने त्यावर टीका करतात. मोदी येथे आले आणि त्यांच्या भाषणात त्यांनी माझे नाव घेतले. ते म्हणाले की काँग्रेसच्या हमींची कोणतीही विश्वसनीयता नाही. काँग्रेस आपल्या सर्व हमी पूर्ण करते पण मोदींच्या हमी कधीही पूर्ण होत नाहीत.’’
नोकऱ्या, आरोग्य विमा आणि आरक्षणाशिवाय अन्नधान्य आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरबद्दलही आश्वासन देण्यात आले आहे. त्यानुसार, गरीबांना महिन्याला सध्या दिल्या जाणाऱ्या पाच किलोऐवजी सात किलो विनामूल्य धान्य दिले जाईल, तसेच झारखंडमध्ये स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर ४५० रुपयांना उपलब्ध करून दिला जाईल. सोरेन म्हणाले की, निवडणुकीनंतर येणारे सरकार या सर्व हमी पूर्ण करेल.