गेल्या आठवडय़ात मणिपूरमध्ये ईशान्येकडील बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले होते. यानंतर पाच दिवस शोध घेऊन लष्कराने म्यानमारमध्ये २० अतिरेकी ठार केल्यानंतर आता नॅशनॅलिस्ट सोशालिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड (एनएससीएन) संघटनेच्या दोघांसह एकूण तीन मूलतत्त्ववाद्यांना आज मणिपूरमध्ये अटक केली आहे.
पश्चिम इम्फाळ जिल्ह्यात एका शोध मोहिमेदरम्यान येथील एका सुपरमार्केटमधून ११ जूनला एनएससीएन-के चा स्वयंघोषित अध्यक्ष खुमलो अबी अनाल याला अटक करण्यात आल्याची माहिती मणिपूर पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. तसेच, एनएससीएन -के चा सक्रिय सदस्य पम्मेई काकिलाँग अलिआस कालिंग याला तमेंगलाँग जिल्ह्यातील चिंगखुलाँग येथून अटक केली.
पूर्व इम्फाळ पोलीस आणि आसाम रायफल्स यांनी संयुक्तपणे केलेल्या शोध मोहिमेत कियामगेई गावातून कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टीचा सक्रिय सदस्य मोहम्मद जहिद अली (वय २२) याला अटक करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ही शोध मोहिम १० जूनला करण्यात आली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा