पीटीआय, इम्फाळ/चुराचांदपूर
मणिपूरमध्ये शनिवारी निदर्शने करणाऱ्या कुकी गटांवर सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात कुकी-झो गटांनी रविवारी बेमुदत बंदचे आवाहन केले. त्यामुळे कुकीबहुल भागांमधील जनजीवन विस्कळीत झाले. तर, कांगपोकपी जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता राहिली. मात्र, हिंसाचाराची एकही नवीन घटना घडली नसल्याचे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कांगपोकपी जिल्ह्यामध्ये कुकी निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये शनिवारी झालेल्या संघर्षामध्ये किमान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि अन्य ४० जण जखमी झाले. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या राज्यभरात मुक्त हालचाली निर्देशांना विरोध करण्यासाठी शनिवारी निदर्शने करण्यात आली होती. त्यादरम्यान सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ रविवारपासून बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. चुराचांदपूर आणि टेंगनौपाल या अन्य दोन कुकीबहुल जिल्ह्यांमध्ये निदर्शकांनी टायर जाळले तसेच रस्त्यांमध्ये मोठमोठे दगड टाकून वाहतूक विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला. तर, सुरक्षा सैनिक ते दगड बाजूला करून रस्ता मोकळा करत होते.

बंदमुळे राज्यातील कुकीबहुल भागांमध्ये व्यावसायिक आस्थापने बंद राहिली, तसेच रस्त्यांवर तुरळक वाहनेच दिसत होती. निदर्शक लोकांना घरामध्ये राहण्याचे आवाहन करत होते. कांगपोकपी जिल्ह्यामध्ये एनएच-२ या (इम्फाळ-दिमापूर) राष्ट्रीय महामार्गालगत गामघिफाई आणि इतर भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा सैनिक दले तैनात करण्यात आले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहनांमधून गस्त घातली जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली.

शांततेचे आवाहन

दरम्यान, सीरियाचे हंगामी पंतप्रधान अहमद शरारा यांनी एक ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध करून शांततेसाठी आवाहन केले. आपल्याला राष्ट्रीय ऐक्य व देशांतर्गत शांतता कायम राखायची आहे, आपण एकत्र राहू शकतो असे ते म्हणाले. सीरियाबद्दल काळजी करू नका, या देशामध्ये टिकून राहण्याचा गुणधर्म आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संयम राखल्याचा दावा

दरम्यान, शनिवारी कुकी निदर्शकांनी केलेल्या हल्ल्यात २७ सुरक्षा सैनिक जखमी झाले अशी माहिती मणिपूर पोलिसांनी दिली. कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी प्रचंड संयम राखला. मात्र, निदर्शकांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला, त्याला त्यांनी उत्तर दिले असा दावा पोलिसांनी केला. हिंसक जमावाला काबूत करण्यासाठी केलेल्या कारवाईदरम्यान १६ निदर्शक जखमी झाले असे त्यांनी सांगितले.