Manipur Women’s Violence Update : मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ४ मे २०२३ रोजी मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात ही घटना घडली. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, दोन महिने उलटूनही अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी निवेदन जारी करत पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याचं सांगितलं.

पोलीस अधीक्षक के. मेघचंद्र सिंह यांनी या व्हायरल व्हिडीओबाबत निवेदन जारी केलं. ते म्हणाले, “दोन महिलांना नग्न करून धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही घटना ४ मे २०२३ रोजी घडली. यानंतर सशस्त्र अज्ञात आरोपींविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

boyfriend killed his girlfriend in pune
पुणे : प्रेमसंबंधातून महिलेवर चाकूने वार करुन खून,प्रियकराला अटक
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Girls, hotel room, meet friend, High Court,
मुलींनो, मित्राला भेटायला थेट हॉटेलच्या खोलीत जाऊ नका.. उच्च न्यायालयाचा सल्ला!
muslim man attacked for allegedly selling beef
Bihar Crime News : गोमांस विकल्याच्या संशयावरून मुस्लीम व्यक्तिला मारहाण; १९ जणांवर गुन्हा, दोघांना अटक
Boyfriend killed girlfriends four year old son after he vomits
उलटी केल्याने प्रेयसीच्या चार वर्षांच्या मुलाचा खून,नाशिकमधील आरोपी अटकेत; बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी
badlapur rape case marathi news
बदलापूर प्रकरणात माध्यम प्रतिनिधींचा आरोपींमध्ये समावेश; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नोटीसा आल्याने संताप
Pimpri chinchwad, sexual assault, 14 year old girl, 14 Year Old Girl assault in Pimpri, Ravet Police station, Damini squad, arrest,
आईच्या प्रियकराकडून १४ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे
ias Shubham Gupta gadchiroli marathi news
कंत्राटदारांकडून खंडणी, निरपराधांना तुरुंगात टाकले…. ‘आयएएस’ अधिकाऱ्याचे नवनवीन प्रताप…..

“या प्रकरणाचा तपास सुरू आहे. राज्य पोलीस दल आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहे,” असंही पोलिसांनी नमूद केलं.

“मणिपूरमध्ये काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना”

मणिपूर पोलिसांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेची माहिती देताना सांगितलं, “मागील २४ तासात राज्यातील स्थिती शांततापूर्ण आहे. मात्र, काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडत आहेत. राज्य सरकार आणि केंद्रीय दलाकडून शोध मोहिम सुरू आहे. इंफाळमध्ये दोन शस्त्रास्त्रांसह दोन मॅगेझिन जप्त करण्यात आले आहेत.”

हेही वाचा : Manipur Horror: दोन महिलांना नग्न करत काढली धिंड, सामूहिक बलात्काराचा आरोप

“५ जिल्ह्यांमधील जमावबंदीची शिथिलता हटवली”

“५ जिल्ह्यांमधील जमावबंदीबाबतची शिथिलता काढण्यात आली असून तेथे कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी हिंसाचारात सहभागी झालेल्या ४५२ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे,” अशी माहिती मणिपूर पोलिसांनी दिली.