मणिपूरमध्ये स्वाइन फ्लूने पहिला बळी गेला असून त्यात पस्तीस वर्षांच्या एका महिलेचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याचे आरोग्य संचालक ओ. इबोमचा यांनी दिली. आणखी एका महिलेचे रक्ताचे नमुने निदानासाठी मुंबईला पाठवण्यात आले आहेत.
इबोमचा यांनी सांगितले की, दुसऱ्या महिलेच्या निदानाचा अहवाल मुंबईहून आज सायंकाळी किंवा उद्या मिळण्याची शक्यता आहे. एच१ एन१ चा संसर्ग पसरू नये यासाठी राज्यात काळजी घेण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा