Manipur Violence: गेल्या वर्षभरापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचं सातत्याने समोर येत आहे. हिंसाचाराच्या घटनेत अनेक लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. मात्र, तरीही हिंसाचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. यातच आता पुन्हा एकदा मणिपूरमध्ये हिंसाचार उसाळला असून परिस्थिती चिघळली आहे. १५ नोव्हेंबर रोजी एक महिला आणि दोन मुलांचे मृतदेह सापडल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर मणिपूरमध्ये पुन्हा एकदा जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.

एवढंच नाही तर १६ नोव्हेंबर रोजी संतप्त जमावाने काही आमदार आणि मंत्र्यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत गाड्याची तोडफोड केली. त्यामुळे पुन्हा मणिपूरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या सर्व घटनांची केंद्र सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने बैठक घेतली. या बैठकीत सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा करत केंद्राने राज्यातील सुरक्षेची परिस्थिती लक्षात घेता केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) ५,००० पेक्षा जास्त जवांनाचा समावेश असलेल्या अतिरिक्त ५० तुकड्या मणिपूरला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath and Congress president Mallikarjun Kharge.
Razakar violence explained: रझाकारांनी खरगेंच्या कुटुंबीयांची हत्या केली? योगी आदित्यनाथांच्या टीकेमागचा खरा इतिहास काय?
Manipur Violence :
Manipur Violence : मणिपूरमध्ये सीआरपीएफ जवानांची मोठी कारवाई; ११ दहशतवादी ठार, दोन जवान गंभीर जखमी
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
Bangladesh Army violence against Hindu
Video: बांगलादेशी सैन्याचे हिंदूंवर अत्याचार; चितगावमध्ये ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?
khanapur vidhan sabha
सांगली, जत, खानापूरमध्ये बंडखोरी; अन्यत्र आघाडी – महायुती लढत

हेही वाचा : Viral Video :…अन् कार्यकर्त्यांची तुंबळ हाणामारी जागेवर थांबली! सामाजिक भान जपणाऱ्या केरळमधील दोन राजकीय गटांचा Video चर्चेत

तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गृहमंत्री अमित शाह यांनी निमलष्करी दलांना मणिपूरमधील शांतता आणि सुव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देशही दिले असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. याबरोबरच मणिपूरमध्ये लवकरात लवकर शांतता प्रस्थापित आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणखी सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गरज भासल्यास आणि सुरक्षा रक्षक जवानांची गरज भासल्यास संख्या वाढवण्याचे निर्देशही देण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

एनपीपीने मणिपूर सरकारचा पाठिंबा काढला

मणिपूरमध्ये भारतीय जनता पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे. मणिपूरमध्ये नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आणि भाजपाची युती संपुष्टात आली आहे. नॅशनल पीपल्स पार्टीने बिरेन सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. तसेच कॉनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल पीपल्स पार्टीने राज्यातील सध्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करत हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पक्षाचे प्रमुख कॉनराड संगमा यांनी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच सरकार सध्याची परिस्थिती हाताळण्याच्या पद्धतीवर असमाधानी असून निष्पाप लोकांचं नुकसान झाल्यामुळे सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याची घोषणा कॉनराड संगमा यांनी रविवारी केली.