मागील तीन महिन्याहून अधिक काळापासून भारताचं ईशान्यकडील राज्य मणिपूमध्ये जातीय हिंसाचार उफाळला आहे. दररोज हिंसाचाराच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत १६० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. तर हजारो कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. अलीकडेच दोन महिलांना नग्न करुन त्यांची धिंड काढल्याचा प्रकारही उघडकीस आला. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभर अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निदर्शने झाली.

या संपूर्ण घटनाक्रमानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. अदाणी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांच्यासाठी मणिपूरमध्ये हिंसाचार घडवला जात आहे, असा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते औरंगाबाद येथे ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
leader Rahul Gandhi vs AAP supremo Arvind Kejriwal
काँग्रेस, आपच्या आरोपांनी ‘इंडिया’त विसंवाद
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे
Walmik Karad wife reaction On Mcoca
“मनोज जरांगे समाजकंटक, त्यानं..”, वाल्मिक कराडच्या पत्नीचा आक्रोश; बजरंग सोनवणे, अंजली दमानियांवर केले आरोप
Image Of Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”

हेही वाचा- “जेवढं विष तुम्ही…”, राहुल गांधींनी सभागृहात दिलेल्या ‘फ्लाइंग किस’वर प्रियंका चतुर्वेदींची प्रतिक्रिया

मणिपूर हिंसाचारावर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मणिपूरमधील हिंसाचार गौतम अदाणींसाठी घडवला जातोय, असा माझा आरोप आहे. मणिपूरमधील खनिजांवर आदिवासींचा ताबा आहे. मागील सहा महिन्यात मैतेई समुदायाने आरक्षणाची मागणी केली, अशी एकही बातमी समोर आली नव्हती. कुठल्याच वर्तमानपत्रात अशी बातमी वाचली नाही. मग केंद्र सरकारने अचानकपणे मैतेई समुदायाला आदिवासी म्हणून आरक्षण देण्याचं का घोषित केलं?”

हेही वाचा- “पंतप्रधान मोदींचं वक्तव्य पूर्णपणे असत्य”, शिवसेना-भाजपा युती तोडण्याबाबत एकनाथ खडसेंचं महत्त्वाचं विधान

“संविधानातील सहाव्या परिशिष्टानुसार, आदिवासी समुदाय वास्तव्यास असलेल्या प्रदेशात ‘आदिवासी काऊन्सिल’ असतात. त्या परिसरात काहीही करायचं असेल तर आदिवासी काऊन्सिलची परवानगी आवश्यक असते. असं असताना मोदी सरकारने मणिपूरमधील खाणी अदाणींना किंवा इतर उद्योग समूहाला दिल्या आहे. पण आदिवासी काऊन्सिल हे मान्य करत नाही. त्यामुळे त्यांनी हिंसाचार घडवला, अशी परिस्थिती आहे. यावर मोदींनी बोलावं”, अशी मागणीही प्रकाश आंबेडकरांनी केली.

Story img Loader