मणिपूरच्या चूराचंदपूरमध्ये आंदोलकांनी राज्यातील दोन मंत्री, पाच आमदार आणि स्थानिक खासदारांची घरे मंगळवारी पेटवून दिली. यात तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आंदोलकांना ऱोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन आंदोलनकर्ते ठार झाले. तर, एकाचा जळून मृत्यू झाला. पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
मणिपूरमध्ये इनर लाईन परमिटच्या मुद्द्यावरून हिंसाचार सुरु आहे. आंदोलकांनी पोलीस उपायुक्तांची गाडीही पेटवून दिली. मणिपूर विधानसभेत सोमवारी तीन विधेयके मंजूर करण्यात आली. या विधेयकांमध्ये इनर लाईन परमिटचाही समावेश होता. याच मुद्द्यावरून आंदोलकांनी पोलीस उपायुक्तांची गाडी पेटवून दिली. ‘पीपल्स प्रोटेक्शन बिल’मध्ये इतर राज्यांच्या नागरिकांना मणिपूरमध्ये प्रवेश करण्यासाठी इनर लाईन परमिट सिस्टम बनवणे आणि १९५१च्या आधीपासून वास्तव्य असलेल्या नागरिकांना संपत्तीचा अधिकार देण्याची तरतूद आहे.
या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Sep 2015 रोजी प्रकाशित
मणिपूर हिंसाचारात तिघांचा मृत्यू; आमदारांची घरे जाळली
मणिपूरच्या चूराचंदपूरमध्ये आंदोलकांनी राज्यातील दोन मंत्री, पाच आमदार आणि स्थानिक खासदारांची घरे पेटवून दिली.

First published on: 01-09-2015 at 10:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manipur violence houses of minister mp 5 mlas torched indefinite curfew imposed