Manipur Violence: गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये सातत्याने हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. हिंसाचाराच्या घटनांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू देखील झाल्याच्या घटना गेल्या वर्षभरात समोर आलेल्या आहेत. आता मणिपूरमध्ये सीआरपीएफच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. जिरीबाम भागात सीआरपीएफच्या चकमकीत ११ संशयित दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीआरपीएफच्या जवानांनी केलेल्या कारवाई दरम्यान दोन जवानही गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, काल दहशतवाद्यांनी काही दुकानांना आग लावली होती. तसेच त्यांनी काही घरांवर आणि सीआरपीएफ कॅम्पवरही हल्ले केले होते. यानंतर सीआरपीएफच्या जवानांकडून दहशतवाद्यांच्याविरोधात कारवाईची मोहिम राबवण्यात आली. यावेळी सीआरपीएफ जवानांनी केलेल्या चकमकीत ११ संशयित दहशतवादी ठार झाले आहेत. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे

हेही वाचा : “मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!

दरम्यान, सीआरपीएफच्या कारवाईत मारल्या गेलेल्या संशयित अतिरेक्यांचे मृतदेह बोरोबेकरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरु असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. याबरोबरच काही नागरिक बेपत्ता असून अतिरेक्यांनी त्यांचं अपहरण केलं आहे की जवानांच्या कारवाईमुळे ते नगरिक लपून बसले आहेत याची माहिती घेतली जात असल्याचं अधिकाऱ्यांनी माहिती देताना म्हटलं आहे.

सशस्त्र दहशतवाद्यांनी बोरोबेकरा उपविभागातील अनेक दुकाने पेटवून दिल्याने जिरीबाम परिसरात तणाव निर्माण झाला होता. जूनपासून या भागात सातत्याने हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारा, दहशतवाद्यांनी बोरोबेकरा पोलिस ठा्ण्यावर गोळीबार केला. यानंतर ते जाकुराडोर करोंग भागात गेले. त्या ठिकाणी त्यांनी आग लावली. यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली, त्यामुळे या भागात मोठा तणाव निर्माण झाला.

अनेक दिवसांपासून घडतायेत हिंसाचाराच्या घटना

मणिपूरमध्ये अनेक दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. मणिपूरमधील परिस्थिती नियत्रंणात आणण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांना देखील काही दिवस तैनात करण्यात आलं होतं. त्यानंतर काही ठिकाणी परिस्थिती पूर्व पदावर येत असतानाच आता पुन्हा एकदा काही ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडत असल्याचं समोर येत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manipur violence major operation of crpf jawans in manipur 11 terrorists were killed two jawans were also injured gkt