ऑलिंपिक पदक विजेती बॉक्सर आणि राज्यसभा खासदार मेरी कोमने बहुसंख्य मैतेई समाजाचा अनुसूचित जमाती (एस.टी.) वर्गात समावेश करण्यावरून तिच्या गृहराज्य मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होत आहे. यासाठी तिने देशाला मदतीसाठी आवाहन केले आहे. मेरी कोमनेही लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना ती म्हणाली, “मला मणिपूरमधील वातावरण चांगले वाटत नाही. काल रात्रीपासून परिस्थिती बिकट झाली आहे. मी राज्य आणि केंद्र सरकारला या परिस्थितीवर पावले उचलण्याचे आणि राज्यात शांतता, सुरक्षा राखण्याचे आवाहन करते. मेरी कोमने रात्री एक ट्वीट करून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली होती.
एम. सी. मेरी कोम म्हणाली, “मणिपूरमधील परिस्थिती माझ्या मनाला दुःखी करीत आहे. यापूर्वी मी असा हिंसाचार कधीही पाहिला नाही आणि तशी कल्पनाही करू शकत नाही. काल रात्रीपासून राज्यातील परिस्थिती आणखी वाईट झाली आहे.” मेरी कोमने राज्य आणि केंद्राला एकत्र काम करण्याचे आवाहन करीत म्हटले आहे की, “मी राज्य आणि केंद्र सरकारला लवकरात लवकर पावले उचलण्यास सांगत आहे, शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी जनतेला देखील विनंती करीत आहे.”
स्टार बॉक्सरने सर्व समुदायांना शांततेने जगण्याचे आवाहन केले आणि ती म्हणाली, “मी सर्व लोकांचा आदर करते. आपण सगळे शांतपणे जगू शकत नाही का,’ हा माझा प्रश्न आहे. जर आपण शांततेत राहिलो तर ते आपल्या सर्वांसाठी चांगले होईल. आपण सर्व या देशाचे बांधव आहोत. या हिंसाचारात काही लोकांनी कुटुंबीय गमावले हेही दुर्दैवी आहे. हे शक्य तितक्या लवकर संपले पाहिजे… मी देवाला प्रार्थना करते की, सर्व काही चांगले होईल.”
भारताची लाडकी बॉक्सर मेरीने रात्री उशिरा एक ट्वीट केले होते, ज्यामध्ये तिने हिंसाचाराचे काही फोटोही शेअर केले. हे ट्वीट करताना मेरी कोमने लिहिले की, “माझे राज्य मणिपूर जळत आहे. मला मदत करा,” अशी भावनिक साद तिने सर्व भारतीयांना केली आहे.
मैतेई समाजाचाचा (जे राज्याच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येचे आहे) एस.टी. प्रवर्गात समाविष्ट झाल्यानंतर हिंसाचाराचा भडका उडाला. या निर्णयाला इतर समाजाने याच कारणास्तव आव्हान दिले आहे. ते त्यांना सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश नाकारतील असेही ते म्हणाले. राज्याच्या लोकसंख्येच्या सुमारे ४० टक्के आदिवासी (नागा आणि कुकीसह) आहेत.
मैतेई समाजाचा अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी चुराचंदपूर जिल्ह्यातील तोरबांग भागात विद्यार्थी संघटनेने ‘आदिवासी एकता मार्च’ काढला तेव्हा हिंसाचार झाला. राज्यातील सर्व दहा जिल्ह्यांमध्ये अनेक निषेध मोर्चे आणि कार्यक्रमात हजारो लोक सहभागी झाले होते. पोलिसांनी या घटनेनंतर ‘असामाजिक घटकांवर’ सोशल मीडियाचा गैरवापर, प्रतिमा आणि द्वेषपूर्ण भाषणे, तसेच व्हिडीओ शेअर केल्याचा आरोप केला आहे.