Manipur Women’s Violence : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात मणिपूर पोलिसांनी ३३ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातली ही पहिली अटक आहे. दोन महिलांना नग्न करण्यात आलं आणि त्यांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मणिपूरमध्ये घढला. मणिपूर मागच्या दोन महिन्यांपासून धुमसतं आहे. अशात ही धक्कादायक घटना घडली आहे.

हेरम हेरादास मेईतेई असं आरोपीचं नाव

या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी आरोपीचं नाव हेरम हेरा दास असं असून तो थौबलचा रहिवासी आहे असं सांगितलं आहे. येत्या काही तासांमध्ये आणखी काही आरोपींना अटक केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात बलात्कार आणि हत्येची कलमं दाखल करण्यात आली आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. हिंदुस्थान टाइम्सने या विषयीचे वृत्त दिले आहे.

Anti corruption department filed case against Wangani Sarpanch Vanita Adhav for demanding bribe
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
Crime case against a motorist, pune, motorist act bad with woman, pune news, pune latest news,
पुणे : महिलेशी अश्लील कृत्य करणाऱ्या मोटारचालकावर गुन्हा
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत
man murder over property dispute, Mumbai ,
मुंबई : मालमत्तेच्या वादातून ३६ वर्षीय व्यक्तीची हत्या, दोघांना अटक
pune session court latest marathi news
योगी आदित्यनाथ यांच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या एकाचा जामीन फेटाळला, महिला पोलिसाला शिवीगाळ
Crime against minor who committed obscene act with girl who came for tutoring Pune print news
शिकवणीसाठी आलेल्या मुलीशी अश्लील कृत्य; अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा

मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी काय म्हटलं आहे?

या प्रकरणामुळे माझे मन प्रचंड दुखावले आहे असं ट्वीट मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी ट्वीट करत म्हटलं आहे. महिलांविषयी अत्यंत अपमानास्पद आणि अमानुष कृत्य करण्यात आलं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची तातडीने दखल घेऊन पोलिसांनी पहिली अटक केली आहे असंही मुख्यमंत्री सिंह यांनी म्हटलं आहे. तसंच सरकार म्हणून आम्ही पीडितेच्या कुटुंबीयांच्या पाठिशी उभे आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय आहे हे प्रकरण?

मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ४ मे २०२३ रोजी मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात ही घटना घडली. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, दोन महिने उलटूनही अद्याप आरोपींना अटक झाली नव्हती. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी निवेदन जारी करत पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याचं सांगितलं, त्यानंतर आज सकाळी या प्रकरणातल्या पहिल्या आरोपीला अटक करण्यात आली.

पोलीस अधीक्षक के. मेघचंद्र सिंह यांनी या व्हायरल व्हिडीओबाबत निवेदन जारी केलं. ते म्हणाले, “दोन महिलांना नग्न करून धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही घटना ४ मे २०२३ रोजी घडली. यानंतर सशस्त्र अज्ञात आरोपींविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” आता पोलीस अटक करण्यात आलेल्या आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

Story img Loader