काही महिन्यांपूर्वी मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. प्रशासकीय अनास्थेवर प्रचंड प्रमाणात टीका झाली. प्रत्यक्ष घटना घडल्यानंतर दोन महिन्यांनी हा व्हिडीओ व्हायरल झाला. तेव्हा कुठे स्थानिक पोलिसांनी व नेतेमंडळींनी यावर व्यक्त व्हायला, कारवाई करायला सुरुवात झाली. खुद्द देशाच्या पंतप्रधानांनीही घटनेनंतर जवळपास ८० दिवसांनी यावर भूमिका मांडली. या भीषण प्रसंगातून गेलेल्या त्या दोन महिला सध्या अज्ञात ठिकाणी आयुष्य पुन्हा सुरू करण्याचा संघर्ष करत आहेत. या दोन महिलांनी बीबीसीशी साधलेल्या संवादात त्यांच्या या संघर्षाची व्यथा मांडली आहे.

“मला एखाद्या जनावरासारखी वागणूक दिली गेली”, ग्लोरीनं(बदललेलं नाव) तिचं दु:ख मांडलं. “त्या भीषण अनुभवासह जगणं माझ्यासाठी प्रचंड कठीण झालं होतं. पण दोन महिन्यांनंतर तो व्हिडीओ व्हायरल झाला आणि मला वाटलं सगळं संपलं. माझ्या जिवंत राहण्याच्या सगळ्या आशाच संपल्या. आपला भारतीय समाज कसा आहे तुम्हाला माहिती आहे. अशा प्रसंगातून गेलेल्या महिलांकडे लोक कसे बघतात याची तुम्हाला कल्पना आहे. या घटनेनंतर इतर लोकांच्या नजरेला नजर देणं मला अवघड झालं. अगदी माझ्या स्वत:च्या समाजातही. माझा स्वाभिमान उद्ध्वस्त झालाय. आता मी पुन्हा पूर्वीसारखी कधीच होणार नाही”, अशा शब्दांत या महिलेनं तिच्या यातना मांडल्या.

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
diljit dossanj back a girl who cried in concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
vidya balan on sridevi
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”
Gym trainer ends life over dispute with boyfriend send video to mother don't leave him shocking Photo
PHOTO: सॉरी मम्मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडून चूक केली…त्याला सोडू नको” आईला शेवटचा मॅसेज करुन संपवलं आयुष्य

ही भीषण घटना घडण्यापूर्वी ग्लोरी एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती, तर मर्सी (बदललेलं नाव) तिच्या दोन लहान मुलांचं प्रेमानं संगोपन करत होती. पण या हल्ल्यानंतर त्या दोघींना दुसऱ्या ठिकाणी पळून जावं लागलं. आता त्या अज्ञात ठिकाणी राहात आहेत. आता त्या दोघी बंद घरातच राहतात.

जिथे स्त्रियांची नग्न धिंड काढली जाते, तो भारत खरंच माझा देश आहे?

मैतेईंबद्दलचा तीव्र संताप

आता ग्लोरीच्या मनात मैतेई समाजाबद्दल तीव्र संताप आहे. “मी कधीच आता माझ्या गावी परत जाणार नाही. मी तिथे लहानाची मोठी झाले. पण आता तिथे पुन्हा जाणं म्हणजे आसपास राहणाऱ्या मैतेईंबरोबर रोजचा सामना करणं. मला त्यांना पुन्हा कधीच भेटायचं नाही”, असं ग्लोरी म्हणाली. मर्सीनंही तिला समर्थन दिलं.

व्हिडीओ व्हायरल झाला नसता तर…

मर्सी म्हणते, “व्हिडीओ व्हायरल झाला नसता, तर हे असं काही घडलंय यावर कुणाचा विश्वासच बसला नसता. कुणाला आमच्या वेदना समजूच शकल्या नसत्या. मला अजूनही भयानक स्वप्नं पडतात. भविष्याबद्दल विचार करताना काळजात धस्स होतं. माझ्या मुलांचं काय होणार? हा प्रश्न प्रचंड सतावतो. त्यांच्यासाठी आम्ही काहीच ठेवलेलं नाही. सगळं काही संपलंय”.

मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड; समाजात अशी विकृती येते कुठून ? प्रत्येक वेळी शिक्षा महिलांनाच का ?

ग्लोरीला पोलीस किंवा लष्करी अधिकारी व्हायचंय!

या सगळ्या भीषण प्रकारानंतर आता शांतपणे विचार करायला वेळ मिळालेल्या या दोघींनी पुढचं आयुष्य कसं काढायचं यावर विचार करायला सुरुवात केली आहे. ग्लोरीला पुढचं शिक्षण पूर्ण करून पोलीस किंवा लष्करी अधिकारी व्हायचं आहे. “मला सर्वांना समान वागणूक देणारी अधिकारी व्हायचंय. आणि मला न्याय हवाय, कोणत्याही परिस्थितीत. म्हणूनच मी बोलतेय, जेणेकरून आणखी कुठल्या महिलेच्या बाबतीत हे घडू नये”, असं ती म्हणाली.

तर मर्सीनं समस्त भारतीय समाजासाठी एक परखड संदेश दिला आहे. “एक आदिवासी महिला असल्यानं आम्ही खंबीर आहोत, सक्षम आहोत. आम्ही हार मानणार नाही. मला सगळ्या समाजांमधल्या सगळ्या मातांना एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही तुमच्या मुलांना हे शिकवा की काहीही झालं, तरी महिलांचा आदर करा”, असं मर्सी म्हणाली.