पीटीआय, नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत असलेले आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत दिल्लीच्या न्यायालयाने शुक्रवारी पाच दिवसांची वाढ केली. ‘ईडी’ने सिसोदियांच्या कोठडीत सात दिवसांची वाढ देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने २२ मार्चपर्यंत ही मुदतवाढ दिली आहे.

दिल्ली अबकारी धोरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या सिसोदियांना ‘ईडी’चे विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी दिल्लीतील या ‘राऊज अ‍ॅव्हेन्यू’ न्यायालयात कडक सुरक्षाव्यवस्था होती. ‘ईडी’कडून न्यायालयात सांगण्यात आले, की सिसोदियांच्या अटकेदरम्यान या प्रकरणी महत्त्वाची माहिती मिळाली आहे. सिसोदिया व अन्य आरोपींची एकत्रित चौकशी करायची आहे. या अन्य आरोपींमध्ये माजी अबकारी आयुक्त राहुल सिंह, दिशेश अरोरा आणि अमित अरोरा यांचा समावेश आहे.

ECI remove NCP Ajit Pawar Faction Ad
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नवी जाहीरात वादात, निवडणूक आयोगाकडून आक्षेप; निवडणुकीच्या तोंडावर नामुष्की
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Three days holiday in school
तीन दिवसांची सुट्टी! मतदानावर काय परिणाम…
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
jupiter retrograde 2024
५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

‘ईडी’ने सांगितले, की सिसोदियांचे माजी सचिव सी. अरविंद यांच्या सोबतही सिसोदियांची चौकशी करायची आहे. सी. अरविंद या प्रकरणी आरोपी नाहीत. ‘ईडी’ने न्यायालयास सांगितले, की सिसोदियांच्या ‘ई मेल’मधून मिळालेली माहिती व त्यांच्या मोबाईल संचाचे न्यायवैद्यक विश्लेषणही करण्यात येत आहे. ‘ईडी’ने या प्रकरणी सिसोदियांना ९ मार्च रोजी तिहार कारागृहातून अटक केली होती. त्याआधी या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सिसोदियांना २६ फेब्रुवारी रोजी अटक केली होती.

मुदतवाढीस विरोध

सिसोदियांच्या वकिलांनी कोठडीत वाढ करण्यास विरोध करत सांगितले, की तथाकथित गुन्ह्यांतून मिळालेल्या उत्पन्नाबाबत ‘ईडी’ मौन बाळगून आहे. मात्र, या प्रकरणी हीच बाब केंद्रस्थानी आहे. कोठडीची मुदत वाढवण्यात काहीच अर्थ नाही. सिसोदिया यांच्या आधीच्या सात दिवसांच्या कोठडीत फक्त चार लोकांसोबत चौकशी झाली.