नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या कथित अबकारी धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज येथील न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. प्रथमदर्शनी सिसोदिया या प्रकरणातील गुन्हेगारी कटाचा सूत्रधार असल्याचे दिसत आहेत, असे जामीन फेटाळताना न्यायालयाने नमूद केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

  सिसोदिया यांची सुटका केल्यास सध्या सुरू असलेल्या तपासावर विपरीत परिणाम होऊन त्याच्या प्रगतीस गंभीर बाधा निर्माण होण्याचा धोका असल्याचे न्यायालयाने नमूद केले. सुनावणीच्या या टप्प्यावर सिसोदियांची जामिनावर मुक्तता करण्यास अनुकूल नसल्याचे विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manish sisodia mastermind of scam delhi court opinion ysh