केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची तुलना जर्मनीचा हुकुमशहा ऍडॉल्फ हिटलर याच्याशी केली. ते मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते.
भाजप म्हणजे गोळ्या नसलेली बंदूक
मनिष तिवारी म्हणाले, “नरेंद्र मोदींनी मुंबईतील एका कार्यक्रमात भारताच्या ब्रॅण्डिंगसाठी सिनेसृष्टीचा वापर करण्याचे म्हटले होते. तेव्हा माझ्या मनात विचार आला की, १९३६ मध्ये जर्मनीचा हुकुमशहा ऍडॉल्फ हिटलरने जर्मनीच्या ब्रॅण्डिंगसाठी बर्लिन ऑलिम्पिकचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. त्याप्रमाणे मोदींनी देशाच्या ब्रॅण्डिंगसाठी सिनेसृष्टीचा वापर करण्याचा विचार मांडला आहे. हिटलरच्या त्या हुकुमशाहीच्या भयावह आठवणी आजही जर्मनीत ताज्या आहेत.”
तिवारींच्या या टीकेला भाजपनेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेत्या मिनाक्षी लेखी म्हणाल्या, “भारताचा इतिहास पाहता देशाने फक्त एकच हुकुमशहा पाहिला आहे आणि त्या इंदिरा गांदी होत्या. त्या देखील काँग्रेसच्या इतिहासाचा भाग होत्या. हे त्यांनी विसरू नये.”
माध्यमांनी स्वनियंत्रण पाळावे- मनीष तिवारी

Story img Loader