पंतप्रधान मनमोहन सिंह यांची सलग पाचव्यांदा राज्यसभेच्या सदस्यपदी निवड झाली. या निवडी बरोबर कॉंग्रेसने आसाम मधील राज्यसभेच्या दोन्ही जागा जिंकल्या आहेत. आसामच्या १२६ सदसिय सभागृहाने डॉ. सिंह यांना पहिल्या पसंतीची ४९ मते देत निवडून दिल्याचे आसाम विधानसभेचे मुख्य सचिव आणि निवडणूक अधिकारी जी.पी. दास यांनी सांगितले. कॉंग्रेसच्या दुस-या उमेदवाराला ४५ मते मिळाली. पराभूत उमेदवार ऑल इंडीया  डेमोक्रॅटीक फ्रंटचे अमिनुल इस्लाम यांना फक्त १८ मते मिळाली. ऑल इंडीया  डेमोक्रॅटीक फ्रंट केंद्रात संपुआचा सदस्य पक्ष आहे. या पक्षाच्या सदस्यांनी आपली दुस-या पसंतीची मते डॉ. मनमोहन सिंह यांना दिली. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निवडीबरोबर  आसाम मधील एकूण सात राज्यसभा सदस्यांपैकी कॉंग्रेसची सदस्य संख्या पाच झाली आहे.  आज, गुरूवारी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान झाले व ५ वाजता मतमोजनी झाली. निवडणूक आयोगाच्या १३ मेच्या अधिसूचने प्रमाने ही निवडणूक ३ जूनच्या आधी पारपाडणे आवश्यक होते. डॉ. सिंग हे सध्या थायलंडच्या दौऱयावर आहेत.

Story img Loader