काँग्रेस ही देशाला लागलेली वाळवी आहे आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे नाइट वॉचमन आहेत, अशी जहरी टीका करणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपवर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बुधवारी लोकसभेत चांगलाच हल्ला चढविला. पुढील निवडणुकीत भाजपची अवस्था २००४ आणि २००९ सारखीच होईल, असे स्पष्ट करून डॉ. सिंग यांनी, जो गरजते है, वो बरसते नही, अशा शब्दात भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. पंतप्रधानांच्या आवेशाचे सत्तारूढ सदस्यांनी बाके वाजवून जोरदार स्वागत केले.
काँग्रेसवर टीका करताना भाजपने असभ्य शब्दप्रयोग केले असले तरी आपण तशाच भाषेत त्याला उत्तर देणार नाही, असे स्पष्ट करणाऱ्या पंतप्रधानांनी गरजते, बरसते, शब्दप्रयोग केल्याने सत्तारूढ सदस्यांचा आवेश चढला होता. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेवरील आभाराच्या भाषणात पंतप्रधानांनी देशाच्या अर्थव्यवस्थेसह अनेक मुद्दय़ांना स्पर्श केला.
भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला असला तरी हीच स्थिती कायम राहणार नाही, येत्या दोन वर्षांत आपण वृद्धिदर ७-८ टक्क्यांवर नेऊ, असेही ते म्हणाले. आपण असभ्य शब्दप्रयोग केलेत तरी त्याच भाषेत उत्तर देण्याचा आपला हेतू नाही, काँग्रेसच्या सरकारने केलेली विकासाची कामेच उत्तम न्यायाधीश आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर शरसंधान करताना डॉ. सिंग यांनी, २००४ मध्ये ‘इंडिया शायनिंग’चा प्रचार आणि २००९ मध्ये ‘आयर्न मॅन’चा प्रचार करूनही भाजपला निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता, याचे स्मरण आपल्या सौम्य भाषेत करून दिले. या सर्व स्थितीचा सारासार विचार करता पुढील निवडणुकीतही जनता विकासाचा विचार करून आमच्याच बाजूने कौल देईल, असे स्पष्ट करून पंतप्रधानांनी, जो गरजते है, वो बरसते नही, असा टोला लगावताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
जो गरजते हैं, वो बरसते नहीं
काँग्रेस ही देशाला लागलेली वाळवी आहे आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे नाइट वॉचमन आहेत, अशी जहरी टीका करणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपवर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बुधवारी लोकसभेत चांगलाच हल्ला चढविला. पुढील निवडणुकीत भाजपची अवस्था २००४ आणि २००९ सारखीच होईल,

First published on: 07-03-2013 at 02:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manmohan singh hits out at bjp