दोषी लोकप्रतिनिधींना संरक्षण देणाऱ्या वटहुकूमाप्रकरणी आपल्याच सरकारवर जाहीररीत्या तोंडसुख घेऊन सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणल्यानंतर आता काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उपरती झाली असून पंतप्रधान मनमोहन सिंग हे आपले गुरू आहेत आणि त्यांचे हेतूही चांगले आहेत, अशी रंगसफेती त्यांनी केली आहे.
येथे एका जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर स्तुतिसुमने वाहताना त्यांना गुरूपदच बहाल केले आणि आपण आधी जे काही वक्तव्य त्यांच्याबद्दल केले होते, त्यावर रंगसफेदी करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधानांच्या सद्हेतूबद्दल जराही शंका नाही, असे राहुल म्हणाले. पंतप्रधान परदेशी दौऱ्यावर असताना वटहुकूमावर टीका केल्याबद्दल भाजपने काही गंभीर शंका उपस्थित केल्याचा संदर्भ देत राहुल यांनी भाजपवरही तोफ डागली.
कर्करोग रुग्णालयाच्या पायाभरणी समारंभानंतर बोलताना राहुल यांनी मनमोहन सिंग यांचा मुक्तकंठाने गौरव केला. या वटहुकूमानंतर आपण त्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले की, तुमच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले आहे. आयुष्यात आपल्याला दोन गुरू लाभले आहेत. एक म्हणजे काँग्रेसच्या अध्यक्षा आणि दुसरे म्हणजे मनमोहन सिंग, जे तुम्ही मला दिले आहेत. मनमोहन सिंग यांनी भारत आणि पंजाबसाठी जे योगदान दिले आहे, तसे कोणीही दिलेले नाही, असे सांगून राहुल गांधी यांनी उपस्थितांची मनेजिंकण्याचा प्रयत्न केला. ‘अगर नियत खराब है तो कुछ नहीं होगा, अगर नियत साफ है तो सब कुछ होगा.. मनमोहनजीकी नियत बिलकूल साफ है,’ या शब्दांत राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांचा गौरव केला.
केंद्रातील पुढील सरकार तरुणांचे