माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज (शुक्रवार) मी कमकुवत पंतप्रधान नाही, योग्य वेळी योग्य ती भूमिका मी घेत आलो आहे. असे म्हणत महत्वाच्या मुद्द्यांवर मौन धारण केल्याच्या टीकांना प्रत्युत्तर दिले.
पंतप्रधान उवाच..
पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले, “यूपीए सरकारच्या काळात अनेक महत्वाचे कायदे संमत करण्यात आले आहेत. देशात सर्व शिक्षा अभियानालाही उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्याही घटली आहे. त्यामुळे मी कमकुवत पंतप्रधान असल्याची टीका अयोग्य आहे. योग्यवेळी मी माझी भूमिका मांडली आहे.” असेही पंतप्रधान म्हणाले. मात्र, आपल्या आजूबाजूचे जग आव्हानात्मक होत चालले आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. पुढील टर्मसाठी मी पंतप्रधापदाची जबाबदारी सांभाळण्यास उत्सुक नाही. राहुल गांधी सक्षम उमेदवार आहेत आणि यूपीए अध्यक्षा योग्यवेळी पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करतील असेही मनमोहन सिंग म्हणाले. कोण म्हणतयं? राजीनाम्याबाबत विचार केलेला नाही. असा सवाल उपस्थित करत गेल्या दहा वर्षांत मला कधीही राजीनामा द्यावासा वाटला नाही असेही मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केले.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, तर देशाचं वाटोळं होईल- पंतप्रधान
पंतप्रधानांनी आपल्या वक्तव्यावरून राहुल गांधी काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच पुढील सरकार यूपीएचेच असेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
मी कमकुवत पंतप्रधान नाही- मनमोहन सिंग
माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज (शुक्रवार) मी कमकुवत पंतप्रधान नाही, योग्य वेळी योग्य ती भूमिका मी घेत आलो आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-01-2014 at 01:08 IST
TOPICSकाँग्रेसCongressपंतप्रधानPrime Ministerपॉलिटिकल न्यूजPolitical Newsमनमोहन सिंगManmohan SinghयूपीएUPAयूपीए सरकार
+ 2 More
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manmohan singh says he is not a weak pm rules out third term