पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज सोमवार राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यसभेच्या सदस्यपदी आसाममधून सलग पाचव्यांदा डॉ.मनमोहन सिंग यांनी शपथ घेतली. यावेळी पंतप्रधानांनी ” हे केवळ आसाम मधील जनतेनेमुळे शक्य झाले आणि हे मी कधी विसरु शकत नाही. त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आज मी सलग पाचव्यांदा आसाममधून केंद्रात राज्यसभा सदस्यत्वाचीशपथ घेऊ शकलो.” असे स्पष्ट केले