भाजपने यूपीए सरकार आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात्वर टीका करत पंतप्रधानांनी आजतागायत आसामचा वापर फक्त राजकीय फायद्यासाठी केला असल्याचे म्हटले आहे
भाजपचे राज्यसभा सदस्य रवीशंकर प्रसाद म्हणाले की, “डॉ.मनमोहन सिंग आसाममधून राज्यसभेवर निवडून गेले आहेत परंतु, १९९१ सालापासून ते आजपर्यंत त्यांनी आसामसाठी काय केले हे त्यांनी याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. गेल्या नऊ वर्षांपासून देशाच्या पंतप्रधानपदी ते कार्य़रत आहेत. जेथून आपण निवडून आलो त्या भागात पंतप्रधानांनी कोणतीच विकासाची कामे केली नाहीत” अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. तसेच पंतप्रधानांनी आसामच्या जनतेच्या वापर फक्त आपल्या राजकीय फायद्यासाठीच केल्याचा आरोप करत आसामच्या जनतेसमोर फक्त आश्वासने दिली आणि नंतर ती सोयीस्कररित्या पंतप्रधान विसरलेही असेही रवीशंकर म्हणाले. 

Story img Loader